अतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक १७/१०/२०२३ रोजी अतिक्रमण पथक प्रमुख उमेश सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागामार्फत नवाथे, काँग्रेस नगर, दस्तूरनगर, मालटेकडी, सातूर्णा, गोपाल नगर, डी मार्ट येथे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली.
सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजुंनी अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाही दरम्यान एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले तसेच अस्पाबंड च्या बाजूला मोठ्या प्रमाणात दीपावलीचे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या.
सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.