नांदगांवपेठ ते पांढुर्णा महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी !
आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट !
गौरव प्रकाशन
मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असतांनाही वरूड मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावर पुसला व निंभी येथे टोल नाक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या महा मार्गावरून मोर्शी वरूड तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने अमरावती ये-जा करीत असताना नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर शेकडो रुपये टोल वसुल करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत असतांना आता पुन्हा पुसला व नींभी येथे टोल नाका सुरू करून वाहन धारकांची लूट होणार असल्यामुळे पुसला व निंभी येथील टोल नाके रद्द करणे बाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन वरूड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
सन २०१७-१८ ते २०१९-२० या कालवधी मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग (एनएच) महाराष्ट्र राज्य मार्फत नांदगांव पेठ ते ते पांढुर्णा हा ०- ९५ कि.मी.च्या सिमेटीकरणाच्या दुपदरी रस्त्याचे काम एचजी इन्फ्रा कंपनी मार्फत करण्यात आले होते. सहर रस्ता हा ९५ किमी असून सदर रस्ता हा फक्त ७० किमी. सिंमेटीकरण झालेला आहे अजुनही २५ कि.मी. रस्ता हा वनखात्याच्या अटी मुळे मागील ४ वर्षाचा कार्यकाळ होऊन सुद्धा पूर्णत्वास आला नाही. परंतु आज रोजी NHAI मार्फत सदर रस्त्यावर पाढुर्णा बार्डर तें पुसला दरम्यान १० कि.मी अंतरावरच १ टोल नाका उभारणे सुरु आहे. तसेच पुसला ते निभी हे अंतर ५१ कि.मी असून तेथे दुसरा टोल नाका उभारने सुरु आहे.
सदर निंभी वरुन नांदगांव पेठ अंतर ३३कि.मी असून तेथे तीसरा टोल नाका हा आधीच सुरु आहे. सदर रस्त्याचे एकुण बांधकाम हे ० ते ९५ कि.मी असून २५ कि.मी. रस्त झालेलाच नाही. म्हणजे ७० कि.मी झाला असून सदर ७० कि.मी.मध्ये २ टोल नाके प्रत्येकी ३५ कि.मी. चा उपभोग घेतल्यानंतर १ टोल नाका आहे. त्यानंतर नांदगांव पेठ तेथील मोठा टोल नाका असे एकूण पांढूर्णा ते अमरावती दरम्यान वाहतूकीस ३ टोल भरावे लागतील, तसेच वरुड ते अमरावती दरम्यान २ टोल नाके भरावे लागतील.
जो पर्यंत सदर रस्त्याचे काम पुर्ण १०० टक्के सिमेंटीकरण होत नाही, व पूर्ण पुलाचे काम होत नाही. तसेच रस्ता सुरक्षा मानकांचे अवलंबन होत नाही तोपर्यंत सदर रस्त्यावरील पुसला रोड वरील श्री. केदार यांचे शेताजवळील व निंभी येथील श्री. साबळे यांचे शेताजवळील टोल नाके सुरु करु नये. कारण सदर उपलब्धतेचा पुर्णपणे उपभोग घेता येत नाही तोपर्यंत त्यांचेवर टोलरुपी आर्थिक भुदंड आकारण्यात येऊ नये, पुसला, निमभी येथील टोल नाके सुरु करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेटून धरली.