Saturday, January 17

पारावरच्या गप्पा….!

पारावरच्या गप्पा….!
खालच्या आळी चा दादा” देवळा समोर बसलेल्या पोरांना काय तरी सांगत व्हता. लांबून ऐकू येईना म्हणून , जवळ जाऊन ऐकाव म्हणून आप्पा “देवळा जवळ आला.आप्पा काही झालं तरी इरोधी पार्टीचा. त्यामुळं त्याला दादा नेमकं काय बोलतोय हे जाणून घ्यायला  आप्पाला मोकर उत्सुकता.
आता दादा म्हंजी मोठी आसामी त्यात गावातल सरपंच पद राखीव असल्यामुळे  उपसरपंच पद दादा कड व्हत. पांढरी फॅक कापड . उंची बी चांगली शरीर पण धडधाकट , म्हणतात ना टक्कलम कवचितच दारिद्रम…अगदी तसच डोक्यार टक्कल , पण हुशार आणि लै अक्कल असल्या मुळे  दादा  गावगड्यात नेहमी पुढंअसणार .शिवाय दादा चा चुलता,म्हंजी नुसतं गावात नाय तर तालुक्यात गाजलेला  कोणाच्या ही हातात न आलेला पैलवान. पण दादा नि त्या चुलत्याला सुद्धा चित करून ,असा डाव टाकला की ईचारु नका…!
दादा पोरांना म्हणत व्हता शिकून कोणाच भल झालं हाय तव्हा ! माह्या कड बघा मी किती शिकलोय? पण वट हाय का नाय गावात. आन रुबाब बी हाय नावात. आता दादा सारखा जबाबदार व्यक्ती नि कस बोललं पाहिजे?पण दादा पोरांना म्हणतोय शिकून कोणाच भल झालंय. . आता आप्पा” बोलून चालून इरोधी पार्टी वाला…त्यानी अस ऐकल्याव त्यो कुड आघत असतो व्हय! माकडाच्या हाती आयत कोलित दिल्याव जे व्हनार तेच झालं. पार तीखाट मीठ लावून खबर साऱ्या गावात आन तालुकभर पोहचली ..दादा अस म्हणला . शिक्षणाने कोणाच भल झालंय ते…! बिचार दादा खर बोलून गेलं की खोट त्येला माहीत पण …दादाचा मात्र कार्यक्रम सुरू झाला.
 माघ बी गावात पाणी नव्हतं तव्हा दादा आपलं सबागती बोलून गेलं गावाला पाणी ज्या यरीतूंन येत व्हतं त्या यरीत पाणी नव्हतं तव्हा दादा आपलं सहज बोललं . आता मी काय त्या यरीत जाऊन … तव्हा बी किती गोंधूळ.
पण दादा लै” खमक्या हाय ह्या येळी सुद्धा बराबर समद बैजवार करणार. दादा च चुकत त्य की पोटात एक आन व्हटाव एक तस नसत जे हाय ते हाय.पण दादा पहिल ठीक व्हत काका व्हत. आता तुम्हांसनीच इतरांना बी सावरून घ्यावं लागलं. त्यो तुमचा मित्र …नेवल्या चा ..मगनराव मोकर बरळत चाललाय त्याला बी समजून सांगा . त्याला आवरा आन तुम्ही बी सावरा.
नाय आपली भावकी हाय हो लोका सारख आपलं नाय. आपली भावकीचा आपल्याला जॅम अभिमान हाय तव्हा म्हणलं दादा तुमच्याशी थेट बोलावं म्हणून  ..दादांच्या भावकीतला तात्या दादा शी बोलत बोलत चालला व्हता…..
Ashok Pawar
अशोक पवार

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply