Thursday, December 4

Story

ताशा, वेश्या आणि कविता
Story

ताशा, वेश्या आणि कविता

ताशा, वेश्या आणि कविता(सत्य कथा.)शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं.मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता.रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती.बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो.मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती.पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता.फटाक्यांचा माळा वाजत होत्या.ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता.तासभर धिंगाणा सुरूच होता.त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली.झोप लागत नव्हती.भूक लागली होती.उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला "क्या कालू झोपला नाहीस अजून". “अगं बच्चन अजून आला नाही”... असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली.ओठावर दोन ब...
आणि कविता जिवंत राहिली.!
Story

आणि कविता जिवंत राहिली.!

आणि कविता जिवंत राहिली.!आणि कविता जिवंत राहिली... ही माझी वास्तव वादी लिहिलेली कथा व्हॉट्स अप वर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाली..अनेकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या.कौतुक केलं..ही कथा व्हॉट्स अप वर फिरत फिरत जळगाव जिल्ह्यातील एका डॉक्टर असलेल्या ताईंच्या व्हॉट्स अप वर गेली.. त्यांनी ती वेळ काढून शांतपणे वाचली.गंमत अशी झाली होती.गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे मिस्टर आणि त्या दोघेही वेगळे झाले होते.त्यांचे मिस्टर सुध्दा डॉक्टर आहेत.ते पुण्यात असतात.करिअर दोघांच्याही आड येतय आणि इतर काही अडचणी यामुळे त्यांच्यात वाद झाले आणि दोघांनी ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. घटस्फोटासाठी दोघांनीही कोर्टात रीतसर अर्ज केला आहे.त्यांची तारीख सुरू आहे.लवकरात लवकर घटस्फोट घेवून दोघेही वेगळे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.माझी कथा वाचल्यानंतर त्य...
शिंगंकाड्या पुंजाजी
Story

शिंगंकाड्या पुंजाजी

शिंगंकाड्या पुंजाजीपुंज्यानं झाकटीतच तमरेट घेऊन घरामांगचा नाला जोळ केला. दोन मिनीटात तरातरा तमरेट हलवत एका हातात बाभूयची दात घासायसाठी काडी व दुसऱ्या हातात भलामोठा लाकडाचा फाटा वढत वढत तो रस्त्यानं चालला होता. तेवढ्यात त्याले आपल्या घराच्या समोर वाडग्यात बुढीनं वाऊ घातलेल्या पऱ्याटीच्या इंधनाच्या कवट्यावर कुत्रं पाय वर करून मुततांना दिसलं.त्यांन दुरूनच हातात गोटा घेऊन "झऊ लेकाचा लाळ सायाचं तं,तथी आलं सती पळाले " आलेलं कुत्रं त्याच्या अवाजानंच भो-- पयालं. तापावर अंग शेकत बसलेल्या झिंगाजीनं त्याले "जरासक आंगगींग शेकसान की नाही पुंजाजीबुवा" म्हणत हाक मारली."असं म्हणताच दोन मिनिटं तमरेट खाली ठेवत पुंजाजी घडीभर तथीसा थांबला."परसाकडे गेलो होतो दिसलं झोळपं हे,म्हटलं बुढीले सयपाक पाण्याले कामी पळते;कामा- धंद्याच्या गरबळीत बुढीले कायले तरास तीले"असं म्हणताच झिंगाजीनंही मंग न राहवत "लयच गरबळ दिस...
शिक्षक अन कर्तव्य… 
Story

शिक्षक अन कर्तव्य… 

शिक्षक अन कर्तव्य...        बाजारातल्या कोपऱ्यात बसून उम्या आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली. "अरे ही चप्पल शिवायची आहे"      समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली. "तुम्ही चोरगे सर ना?" त्याने विचारलं. "हो.तू?"       "मी उम्या, उमेश कदम.कल्याणी शाळेत दहावी अ च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी  शिकवायचे."       "बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" चोरगे  सर त्याला निरखत म्हणाले.       "असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन" "पण तू हा व्यवसाय का.....?"        "सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय." "काय झालं वडिलांना?        "सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय.त्यामु...
फसवणूक…
Story

फसवणूक…

फसवणूक.."अहो, संकेत काय म्हणतोय एकलं का?" रमाने आपल्या नवऱ्याकडे पाहून विचारले." पेपर वाचण्यात दंग असलेल्या मनोहरने डोके वर न करताच विचारले, "काय म्हणतोय तुमचा लाडोबा?" "इथल्या पेक्षा तिथे परदेशात चांगली नोकरी मिळतेय, तिथे जायचं म्हणतोय" "हां! असे अचानक! काय रे, इथे नोकरी करणार होतास ना? टाटा कंपनीतून बोलावणं आलं म्हणून सांगत होतास ना? मग हे खूळ कसं बरं आलं?" "बाबा, इथे फार स्कोप नाही हो. इथे जे कमवायला दहा वर्षे लागतील ते मी अमेरिकेत दोन वर्षात कमवेन." एवढ्यात संकेतच्या बाबांचे मित्र, सुरेश आले. "काय रे  काय एवढा वार्तालाप चाललाय? घरात शिरताच त्यांनी विचारले.सुरेश आणि मनोहर बालमित्र. शाळा, कॉलेज आणि नोकरी सुध्दा दोघांनी एकाच कंपनीत केली. दोघांनी ठरवून पुण्यात आपली घरे ही जवळ जवळ घेतली. दोघांच्या बायका मात्र वेगवेगळ्या प्रदेशातल्या. एक कोकणातली मराठमोळी तर सुरेशची गुजराथी. एक झूणका, का...
अदलाबदल…
Story

अदलाबदल…

  'जिच्यामंधी आमुची मायबोली वसे ती आम्ही वऱ्हाडीच बोलू कौतिके' *'ढंगरी बुढी'*…हो….'ढंगरी बुढी'च.काहुन कां सारं गांव तिले ढंगरी बुढीच मने.कोन्तई काम सांगतलं कां तिचे बायने ठरलेलेच राह्ये.तिचं खरं नांव फक्त तिच्या घरच्या लोकाईलेच माईत असंन,पन तिच्या घरचेई तिले 'ढंगरी बुढी' ह्याच नावानं हाका मारे. भोकरबड्डीचं माहेर असलेली हे बुढी लगंन हुन श्यापुरात आली ताहापासून तिनं माहेराचं तोंड पाह्यलं नाई असं गावचे जुने जानते लोक मनतेत.त्याले तिच्यापाशी कारनंई तसंच सबय हाये.लगंन झालं ताहा मायनं लगनात आलेल्या सबंन वऱ्हाड्याईम्होरं सांगतलं व्होतं मने,बाई लडू नोको,आता 'थेच तुयं माहेर अन् थेच तुयं सासर'.हेच वाक्य तिनं मनामंधी गोंदून ठिवलं व्होतं.ना पह्यल्या अखाळीले गेली ना पयल्या दिवाईले.सासरी जे येटोयी मारुन बसली थे आजतागायत.तं अशी हे ढंगरी बुढी. लगंन झाल्याझाल्या पयले चार पाच वर्स असेच गेले.गोया घिवू घिवू त...
अंगापेक्षा बोंगा जड.!
Story

अंगापेक्षा बोंगा जड.!

रावसाहेबांच्या घरी आज धावपळ चालली होती व त्याला कारण आज त्यांच्या मुलीला, संध्याला बघायला नवरा मुलगा येणार होता. रावसाहेब भल्या मोठ्या वाडवडिलांच्या घरात राहत. एकेकाळी उच्च श्रीमंत होते पण सध्या तशी परिस्थिती नव्हती. तरी ते खोट्या श्रीमंतीचा डौल दाखवत. मुलीला बघण्याच्या कार्यक्रमाचा पण एवढा दिखावा की मुलाकडच्या माणसांना त्यांची श्रीमंती दिसावी. मुला मुलीने एकमेकांना पसंत केले. साखरपुड्याची तारीख ठरवली व रावसाहेबांनी लगेच तो करून ही टाकला. साखरपुडा खूपच दिमाखात साजरा केला. मुलाला हिऱ्याची अंगठी व भारीतले कपडे घेतले. सगळ्या नातलगांना बोलवून, राजेशाही खानपान वगैरे देऊन, थाटामाटात साजरा केला. लगेच पुढच्या महिन्यात लग्न ही ठरवले. त्याकरता मोठा ए.सी वाला महागडा हॉल,भारी सजावट व उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे खान पान ठेवले होते. मुलीचे दागदागिने, कपडे लत्ते, देणे घेणे सगळे लोकांच्या नजरेत येण्या सारखे...
माझी आई इंदिरा नारायण कामत
Story

माझी आई इंदिरा नारायण कामत

"प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई" महान कवी श्री माधव ज्युलियन यांनी केलेले हे वर्णन माझ्या आईशी हुबेहूब जुळत आहे. माझी आई प्रेमाने भरलेली व वात्सल्याची सिंधूच होती. आईला आम्ही "आत्या" म्हणत असू. माझे मामा, मावशी तिला आत्या म्हणायचे तेच आमच्या तोंडवळणी पडले. गोव्याच्या सावर्डेे जिल्ह्यात, काकोडा नावाचा गाव आहे. तेथे माझ्या आईचा जन्म झाला. आई धरुन सर्व अकरा भावंडे. काही मामा,मावशा माझ्या मोठ्या भावाहून लहान आहेत. माझ्या आईने स्वतः आई झाल्या नतंरही आपल्या आईची बाळंतपणे काढली होती. लहानपणी ती वडिलांची खूप लाडकी होती, कारण सर्व भावंडात ती हुशार होती. वडिलांना दुकानाच्या व शेतीच्या कामात मदत करायची. तिचे खेळ सुध्दा मुलांसारखेच होते. नदीत पोहणे, झाडावर चढणे, सायकल शर्यत लावणे, लगोरी, विटीदांडू व टाबुल फणा या सारख्या खेळात ती तरबेज होती.वयाच्या पंधराव्या वर्षी तिचे लग्न तिच्याहून बारा वर्षांन...
देवदासी….
Story

देवदासी….

सुनंदा व मी शाळेतल्या मैत्रिणी. एके दिवशी शाळा सुटल्यावर तिला घेऊन मी माझ्या घरी आले. पण ती आमच्याकडे आलेली माझ्या घरच्यांना आवडले नाही. ती घरी गेल्यावर आई मला म्हणाली, "क्षमा, त्या सुनंदाशी जास्त मैत्री नको करू हं". "का गं आई? तिचं गणित खूप चांगलं आहे आणि ती नेहमी मला मदत करते". "सांगीतलं ना, जास्त जवळीक नको."मी हो म्हटले, पण आईचे म्हणणे मनावर घेतले नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी तिच्या घरी गेलो. तिथे ओट्यावर एक साडी नेसलेली बाई बसली होती. सुनंदाने 'ही माझी ताई' अशी ओळख करून दिली. आमचा आवाज ऐकुन सुनंदाची आई बाहेर आली. मला पाहून तिला फार आनंद झाला नाही आणि इशाऱ्याने तिने सुनंदाला आत बोलावून घेतले. मी मात्र वेंधळ्यासारखी तिच्या ताईकडे पाहतच राहिले.ओठावर लिपस्टिक, लांबलचक केसांवर माळलेले गजरे, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि डोळ्यात घातलेले काजळ ह्यामुळे तिची ताई फारच सुंदर दिसत होती. कुणाची तर...
Story

भय

सुरेश रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेहून एक महिन्यासाठी आलेला. अगोदर तो तेथे शिकायला गेला होता. तेथल्या कंपनिने त्याला तेथेच नोकरी दिली होती. रावसाहेबांना आणि मम्मीना त्याच्या लग्नाची घाई होती. त्याला कारण ही होते. शैला रावसाहेबांच्या मित्राची मुलगी तिला त्यांनी लहानपणीच सून म्हणून मानले होते. सुरेशची ही ती बालमैत्रीण होती. दोघं ही एकमेकाला आवडत होती. पण रावसाहेबांना भिती वाटत होती. पोरग अमेरिकेला जॉब करणार मग तेथलीच कोण पकडली तर मग शैलाचे कसं होणार? तेव्हा लवकरात लवकर लग्न केलं की आपण दिलेल्या वचनातून मुक्त होऊ. म्हणून चहा घेताना त्यांनी सरळ सुरेशला सांगितले"आता सुट्टीवर आलायं तर तुझं आणि शैलाचे लग्न उरकून घेऊ" "कां घाई करतात मला सेटल होऊ द्या ना?" "त्यात काय लग्न कर आणि शैलाला ही बरोबर घेऊन जा."हो नाही करता शेवटी सुरेश तयार झाला. लगेच पुढच्या आठवढ्याचा मुहुर्त ही काढला...