Sunday, December 7

Story

मी पाहिलेली दुर्गामाऊली…
Story

मी पाहिलेली दुर्गामाऊली…

मी पाहिलेली दुर्गामाऊली...शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड येथे हृदय संमेलनाच्या निमित्ताने जाणं झालं. तिथे जे काही अनुभव आले हे अगदी थोडक्यात सांगायचं तसं कठीणच. पण नवरात्राच्या निमित्ताने मी पाहिलेली दुर्गा मला नमूद करावीशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच. आघाद स्मरणशक्ती, अचंबित करणारी कृतिशीलता आणि शब्दातही मांडता येणार नाही अशी जिद्द असणारी ती अगदी तरतरीत आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक पटपट चालत येऊन स्टेजवर खुर्चीत बसली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे फिरल्या.कारण तिच्याकडे पाहिलं की देवानं तिला एका विशिष्ट कार्यासाठी आणि विशिष्ट पद्धतीने बनवले आहे हे नक्कीच लक्षात आलं. जिथे हट्टेकट्टे दोन हात, दोन पाय, डोळे इत्यादी असं समृद्ध शरीर दिलेलं असताना देखील आम्ही कधी त्या विधात्याचे आभार मानत नाही की त्यांची काळजी घेत नाही. कारण त्याचं मूल्य आम्हाला जाणवतच नाही. आमच्यासारख्या सर्वसामा...
आशेचा कुबडा: माणुसकीचा खरा चेहरा
Story

आशेचा कुबडा: माणुसकीचा खरा चेहरा

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो... तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड ....सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले... बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे... बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत.... ! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती....थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते... अरे ! माझा अंदाज चुकला तर....उत्सुकता वाढली म्हणुन त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, डॉक्टर, नका जावु, वेडा आहे तो !उत्सुकता स्वस्थ बसु देइना म्हणुन गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील....पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तीथंही अंदाज चुकला माझा....मीच म्हणालो, बाबा काही त्रास ? कुबडी घेत हळु...
 शेतकऱ्याची बैलजोडी.! 
Story

 शेतकऱ्याची बैलजोडी.! 

 शेतकऱ्याची बैलजोडी.! चैत्राची गुढी उभारली होती‌.गुढीपाडवा मोठ्या आनंदानं साजरा झाला होता.आता कास्तकाराचा सण म्हणजे पिका, पाण्या अभावी साधासुधाच, म्हणजे काजयानं डोया साजरा करावा तशीच बुराट गोठ होती.पण शंकऱ्याचं मन कशातच लागत नव्हत. विषयही तसाच गंभीर होता. या बैलजोडीच्या पायी तर त्यानं लगन पाणी,मरणं,धरणं, सगेसोयरे,नातेवाईक सारंच सोडून देलं होतं.शेपाचशे रूपयाची गोठ असती तर वाली गोठ होती. पण इथे तर पन्नासक हजाराचा साजरा झटका होता. कोणता  सोयरा,धायरा ही त्याले मदत करण्या इतपत धनसेठ नव्हता. हे आलेलं अस्मानी संकट त्यालेच एकल्याले निस्तारा लागत होतं.ऐन दुष्काळात म्हणजे तेराव्या महिन्यात एवढा मोठ्ठा गड्डा भरणं मोठं जिकरीचंच होतं. बैलजोडी पाई पुरा पागल झालेल्या शंकऱ्यानं आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सारी गावं खंगाळून काहाढली होती. रातची त्याची झोप मुश्किल झाली होती. त्याची जोडीही तशी...
परिश्रमाचे आणि संकटाचे कडवे चित्र : शेतकऱ्याची बैलजोडी
Story

परिश्रमाचे आणि संकटाचे कडवे चित्र : शेतकऱ्याची बैलजोडी

परिश्रमाचे आणि संकटाचे कडवे चित्र : शेतकऱ्याची बैलजोडीचैत्रातलं उन्ह साजरंच कयकत होतं.उन्हानं रस्त्यावरचा फफुळ्ळा चांगलाच गरम झाला होता. झाडाझुडपाचा पालापाचोळा साऱ्या रस्त्यावर पसरला होता. कास्तकाराचा वावारातला दायदाना सुखरूप घरी आला होता.ज्याले लयच गरज होती त्यानं तालुक्यातील धान्य बाजारात मिळेल त्या भावात आपला शेतमाल इकटाक केला होता.शंकऱ्यानं डोक्शाले मयकट टावेलचं फडकं गुंडाळून  गावाशेजारीच घरामांग असलेल्या आखरात निंबाच्या झाडाखाली सावलीत बांधलेल्या बैलाईले कडब्याची पेंडी टाकून तरंतरं घरी आला. उभ्या उभ्याच त्यानं न्हाणीत जाऊन नांदीतलं तमरेटानं थंड पाणी आंगावर घेतलं.खापरानं आंग घासून,टावेलानं साजरं निपक आंग पुसलं. तोपर्यंत त्याच्या बायकोनं गरम भाकर व ताकातलं तिखटवखट चून तयार केलं होतंच.हातापायाले खोबरेल तेलाचा हात लावून कनोडयातल्या वर भिंतीच्या खोबनीत फसवलेल्या फुटलेल्या आरशात पा...
चौऱ्यागढ
Story

चौऱ्यागढ

दरवर्षीप्रमाणेच औंदाही पचमढी मध्यप्रदेशात असलेल्या चौऱ्यागडावर जाण्यासाठी शालक्या उत्सुक होता.तसं त्याच पिढीजात परंपरागत ठाणं चौऱ्यागडच होतं. त्याच्या बापजादयापासून ही मोठ्या महादेवाच्या पुजनाची पंरपरा घराण्यातच होती‌. सोयऱ्या धायऱ्याईलेही त्यांन फोनाफोनी करून कोणाले बजारहाटाच्या गावात भेटलेल्या पावन्या-रावन्याईजोळ निरोप धाडला होता.सिताराम बुढयाच्या खटल्यात सारा 'बचपणा' गेलेला शालक्या तसा इमानदार व काटक गडी होता. दररोजच्या सामानापासून तं सणावारापासून सामानाची सारी खरेदीची जबाबदारी सिताराम पाटील त्याच्या वरच सोडून देत होता. एका नव्या पैशाचाही घापला शालक्यानं हिसोबात आजपर्यंत केला नव्हता. सिताराम बुढयाचा तो विश्वासु घरगढी होता. गावाच्या मध्यभागी एकरभराचा मोठा सागवानी वाडा असलेला व सत्तर एककर जमीनजुमला पाठीमागं असलेला मोठा असामी पाटील पण शालक्या च्या घरी गेला म्हणजे साजरा बकरीच्या दुधाचा सिंग...
म्या पाहयलेलं माह्य मरन
Story

म्या पाहयलेलं माह्य मरन

नुकताच फेब्रुवारी सुरू झाला होता. उन्हाच्या झ्यावा चांगल्याच आंगाले झोंबत  होत्या. झाडांची पानगळ होऊन सारा फफुळळा वावटयी संग झिंगझिंग झिंगाट करत होता. गरम सुटणारा वारा चांगलाच रन्नावला होता.बायामाणसांनी मोठ्या कष्टाने सोंगलेले गहु, हरभरयाचे कवटे आपल्या संग घेऊन जात होता. मोठमोठ्या वावटया सुटून पालापाचोळा दुरवर आकाशाले गवसनी घालत होता.मजूरांना भिववीत होता.जो तो आपापल्या कामात गर्क होता.समोर मार्च महिन्यात धूयमाती असल्यानं सणासुदीच्या दिवसांत चार पैसे गाठीले रायले पायजे तेवढीच आपल्या संसाराले मदत होईल.या आशेने आपल्या  हरभरा सोंगूनसोंगून हरभरयाच्या खारानं हातापायांच्या फुटलेल्या जखमांवर बिबे  भरत होता.  काहींनी हाताले पालू गुंडाळले होते. सारया हातापायाची खारट खारानं  आगाआग होत होती.हरभरयानं पिवळेधम झालेले वावरं  मजूरांच्या ईव्यच्या दणक्याने भराभर खाली होत होते.जागोजागी बैलबंडीनं कवठे जमा ...
नंदीबैलासोबत भटकंती करत अमोल झाला पोलीस अधिकारी
Story

नंदीबैलासोबत भटकंती करत अमोल झाला पोलीस अधिकारी

अमोलची कथा हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जिथे परिस्थितीशी झगडत आणि स्वप्नांचा पाठपुरावा करत एका तरुणाने आपलं आयुष्य बदललं. ही कथा ग्रामीण भागातील, ईश्वरपुरच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या व साध्या कुटुंबात जन्मलेल्या अमोल चिमाजी गोंडेची आहे, जो कधी नंदीबैल घेऊन गावोगावी भटकायचा, आणि आज पोलीस अधिकारी आहे. अमोल हिंदू मेंढगी जोशी नंदीबैलवाले समाजातील बारामती मधील मेडद या गावचा पहिलाच अधिकारी झाला आहे.अमोल एका लहानशा गावात राहणारा मुलगा. वडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. आईने कष्ट करून घर चालवण्याचा प्रयत्न केला, पण त्यासाठी अमोललाही हातभार लावावा लागला. लहान वयातच त्याला नंदीबैल सांभाळून गावोगावी फिरावे लागे. नंदीबैलासोबत तो लोकांकडून भिक्षा मागत असे, आणि त्यामुळे त्याचं शिक्षण वारंवार अडचणीत येत असे.अमोलला शिक्षणाची आवड लहानपणापासून होती. भटकं...
मिरूग…
Story

मिरूग…

मिरूगमीरगाचं  पाणी पडलं होतं.रातभर धोधो पाऊस बरसत होता. नदया नाल्या ओंसडून वाहत होत्या. घरावरचे कवलं, पाखे, पार संततधार पावसानं धुवुन टाकलं होतं. काहीची त घरं अभिषेक केल्या सारखी टपकत होती. घरातली सर्व भांडीकुंडी, भदाळं याच कामी लावली होती. भांडयात पाणी पडल्यावर त्याचा टणनटणन आवाज रातभर कानात घुमत होता. काहीनी तर आधीच छावण्या, भारके भीताडाले लावले होते. दाठठयात व घरात पाणी धसु नये म्हणुन झाडांच्या बेपाटया तोडुन त्यावर पराटया व बजारातुन आणलेला मीटरदोनमीटर मेनकापड आथरला होता. इंधनकाडी, व कडबाकुटाराचीही झाकझुक केली होती. ढोरं वासरं मंदीराच्या भीताडापाशी आंगचोरुन ऊभी होती. मोकाट कुत्र्याचे ही हाल होत होते. तेही कोणाच्या गरम ओटयावर ग्रामपंचायतीच्या माग नाही तर मंदिरांच्या ओटयावर मुरकडी घालुन बसली होती. चार दोन म्हातारी-कोतारी अंगावर पोतयाच्या घोंगड्या घेउन पारावरून पावसाची गमंत पाहत होती. ...
दिवाई…
Story

दिवाई…

दिवाई...दोन दिवसावर दिवाई येऊन ठेपली होती.बजारहाटेत लोकाची सामानसुमान खरेदीसाठी करण्यासाठी निरानाम गर्दी ही गर्दी दिसायची.सणासुदीच्या दिवसात कित्येकांच्या घरादाराची सुरू असलेली साफसफाई व रंगरंगोटी संपत आली होती. कपडेलत्ते,फळे,फटाखे,फरायाची दूकाने मस्त सजली होती. प्रत्येकाच्या चेहरयावर सणासुदीचा आनंद झळकत होता.लहानापासून तर मोठया पर्यत सारीच दिवाईच्या सणानं कामाले लागली होती.यशोदीलेही अजून चारपाच घरची धुणीभांडी करायची होती.मोठया लगबगीने ती कामासाठी पायटीच निघाली होती.सपासप पावल टाकत अंतर कापत होती.डोकं मात्र विचारान सुन्न झालं होतं. झाकटीतच उठल्या पासून नीरा नुसती धावाधावच तीच्या पाचवीला पुजली होती.कामानं तीचं सार आंग आंबून गेल होत.कामान आलेला थकवा तीच्या हाडकुळया ,निस्तेज चेहऱ्यावर व क्षीण झालेल्या देहावर क्षणोक्षणी जाणवत होता.कुपोषणाने शरीर गलीतगात्र झालेलं, नेहमी एकच मळकट साडी, मध्...
यशोगाथा तिच्या संघर्षाची
Story

यशोगाथा तिच्या संघर्षाची

यशोगाथा तिच्या संघर्षाचीपाचवीला असल्यापासून ती कष्टाशी भिडत राहिलेली.तिच्या आजी आजोबांसोबत भाजीपाला विकता विकता एम. कॉम. पर्यंत शिक्षण तिने घेतलं.आयुष्याच्या त्याच वळणावर तिचं लग्न माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत झालं.त्यावेळी मी वॉचमन होतो.आमचं लग्न झालं खरं परंतु एकमेकांच्या संघर्षाला सोबत घेऊनच आम्ही बोहल्यावर उभे राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट आजही आठवतो मला.त्या पांढऱ्या वस्त्रावर त्याक्षणाला कदाचित आमच्या दोघांच्या आयुष्याचं ध्येय एकत्र येऊन नटलेलं असावं.लग्नानंतर तिचं शिक्षण पाहता मी तिला अगदी दुसऱ्या दिवशी म्हणालो सुध्दा, “ दिपाली एम. कॉम.झालेलं आहे. घरात बसून चालणार नाही.पुढं ही शिक आणि नोकरी ही कर.मी सोबत राहीन.” त्यावेळी तिने मला उत्तर दिलेलं. ती म्हणाली होती, “ आयुष्यात नोकरी करायला मला कधीच जमणार नाही.घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मला ते शक्य ही ह...