19 व्या शतकातील अमेरिकेत फॅट पुरुषांचे क्लब.!
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरूवातीला, शारीरिक आकार आणि वजन या बाबींना समाजात वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जात होतं. त्या काळात, जास्त वजन असलेले पुरुष हे समृद्धी, आरोग्य आणि यशाचे प्रतीक मानले जात होते. त्यावेळी मोठ्या शरीराचे माणसं मॅनेजमेंट, व्यापार, किंवा नेतृत्त्व यशाचे चांगले उदाहरण मानली जात होती.त्यावेळी जाड माणसं म्हणजे जास्त खाल्लं आणि समृद्ध जीवन जगतात असं मानलं जात होतं. जसे, "अधिक खाल्ला म्हणजे अधिक सुसंस्कृत" असं एक प्रकारचं गृहीत धरलं जात होतं. त्यामुळे त्या काळात वजन वाढवणं आणि जाड होणं हे एक समाजात प्रतिष्ठा मिळवण्याचं साधन मानलं जात होतं.19 व्या शतकात, अमेरिकेत विविध सामाजिक क्लब्स खूप लोकप्रिय होते. लोक आपल्यातील समान वय, व्यवसाय, आवडी-निवडी किंवा शारीरिक आकाराच्या आधारावर गट तयार करत असत. "फॅट पुरुषांचे क्लब" देखील अशाच एका प्रकारचा गट होत...

