ऊर्जायान : वर्तमान धर्मांधतेला उत्तर देणारे मुखपत्र -यशवंत मनोहर
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : "ऊर्जायान हा विशेषांक पूर्वीच प्रकाशित व्हायला हवा होता. पण तो आज प्रकाशित झाला. त्यालाही संदर्भ आहेत. वर्तमान धर्मांधतेने ग्रासलेला असताना एक नवा सर्वकल्याणकारी विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारे लेखन ऊर्जायानात यायला हवे. असे झाले तर ऊर्जायन हे वर्तमान धर्मांधतेला प्रखर बुद्धिवादी उत्तर देणारे मुखपत्र ठरेल" असे विचार प्रख्यात तत्त्वज्ञ डॉ. यशवंत मनोहर यांनी मांडले. भीमा कोरेगाव शौर्यदिन व मुलींच्या शिक्षणाच्या आरंभदिनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या संदीप गायकवाड संपादित 'ऊर्जायान विशेषांक - २०२५' चे प्रकाशन करताना अध्यक्ष या नात्याने बोलत होते. ते पुढे म्हणाले, "ऊर्जायन भविष्यात समाजप्रबोधनाचे काम करणारे नियतकालिक व्हावे, वर्तमानातील वणव्याचे प्रतिबिंब रेखाटणारे आणि भारतीय समाजाला नवी दिशा देणारे मुखपत्र व्हावे आणि जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व भा...







