लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन
लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहनगौरव प्रकाशन अमरावती | १6 जून २०२५नाशिक येथे १५ जून २०२५२०२५ रोजी पार पडलेला आकाश गायगवळी (जळका, शहापूर – अमरावती) आणि मेनका वाघ (नाशिक) यांचा विवाह समाजातील पारंपरिक रूढी व अंधश्रद्धांना छेद देणारा ठरला. लग्नानंतर १६ जून रोजी शहापूर तालुक्यातील जळका गावात आयोजित स्वागत समारंभात डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी या विवाहाचे कौतुक करत स्पष्टपणे आवाहन केले – "लग्नातील अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा नष्ट करा!"या विवाहात पारंपरिक ‘हळदी समारंभ’ घेण्यात आला नाही. विवाहपत्रिकेतच याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय, वधू मेनका वाघ यांनी परंपरेतील काळे मणी नसलेले मंगळसूत्र परिधान करत सामाजिक संकेतांना आव्हान दिले.डॉ. मुन्द्रे म्हणाले, "काळे मणी न घालता देखील मंगळसूत्र पूर्ण असू शकते, हे या दोघा...








