Thursday, March 5

News

शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’
News

शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’

शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या गौरम्मा या शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आईने आपल्या चारही मुलींना मोठं करून दाखवलं आहे. आर्थिक अडचणी, गरीबी, कष्ट यांना तोंड देत गौरम्मांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलं आणि आज त्याच मुलींनी सरकारी नोकरी मिळवून आईचं स्वप्न साकारलं आहे.गौरम्मांच्या दोन मुली सध्या पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत, तर उर्वरित दोन मुली शिक्षिका झाल्या आहेत. गावातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ही यशोगाथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.“पुढचा जन्म असेल तर पुन्हा हीच आई मिळावी,” असं कौतुकाने सांगणाऱ्या गौरम्मांच्या मुली आपल्या यशाचं श्रेय पूर्णपणे आईला देतात. “आईने न थकता आयुष्यभर मेहनत केली, शिक्षणासा...
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळ
News

बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळ

बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळबीड : शहरात काल रात्री (गुरुवारी, ता. २५) एका तरुणाची हत्या झाली. मृतक यश देवेंद्र ढाका (वय २२) हा स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. माने कॉम्प्लेक्स परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.माहिती नुसार, यश आणि त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात वाढदिवस साजरा करताना वाद निर्माण झाला होता. महिन्याभरापूर्वी देखील यश आणि सूरज यांच्यात भांडण झाल्याची नोंद आहे. या भांडणामुळे दोघांमध्ये वैर निर्माण झाला होता. गुरुवारी रात्री माने कॉम्प्लेक्स परिसरात वाद पुन्हा उफाळून आला.वाद इतका तीव्र झाला की सूरजने सोबत असलेला धारदार शस्त्र बाहेर काढून थेट यशच्या छातीत दोन आरपार वार केले. या वारांमुळे यश लगेचच रक्तबंबाळ झाला आणि कोसळला. जखमी अवस्थेत त्याला तातडी...
शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल
News

शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल

धाराशिव: मराठवाड्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकं, घरं आणि जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक कुटुंबं उघड्यावर पडली आहेत, तर शेतकरी घरदार सांभाळण्यासाठी धडपडत आहेत.अशा वेळी नागरिकांना प्रशासनाची मदत अपेक्षित असताना, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ समोर आला. हा कार्यक्रम तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी फक्त उपस्थिती लावली नाही, तर गाण्यांवर ठेका धरतानाही दिसल्या, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.घटस्थापनेच्या रात्री आणि त्यानंतरच्या दिवसांत आलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र पुराचे दृश्य दिसत होते. शेतकरी पिके, जनावरं आणि घरं पाण्यात बुडत होती, पण त्याच दि...
14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका
News

14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका

माढा (प्रतिनिधी) : माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे केवड गावात एक थरारक प्रसंग उभा राहिला. येथील ज्येष्ठ नागरिक कुबेर नामदेव धर्मे हे तब्बल १४ तास झाडावर बसून जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत राहिले. शेवटी मंगळवारी मध्यरात्री ११:५० वाजता रेस्क्यू टीमने ७५ किलोमीटरचा प्रवास करून त्यांची सुखरूप सुटका केली.सकाळपासून अडकलेले संकटातमंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून कुबेर धर्मे हे पूरग्रस्त भागात अडकून पडले. वाढत्या पाण्यामुळे त्यांनी जवळच्या झाडावर आश्रय घेतला. नदीच्या पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की गावकऱ्यांना त्यांना मदत करणे शक्यच झाले नाही.मोबाईल आणि ड्रोनच्या मदतीने शोधधर्मे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून काही लोकांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ड्रोन कॅमेराचा वापर करून त्यांचा शोध घेतला. झाडावर अडकलेले असल्याचे स्पष्ट झाल्यावर लगेच रेस्क्यू टीमला खबर देण्या...
बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार
News

बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून प्रचंड पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी कोणतीही ठोस दखल घेतली नाही, असा आरोप करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत आगळीवेगळी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत आणि शेतकऱ्यांच्या दुःखाला कोणी न्याय देणार, असा प्रश्न या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजतक्रारीनंतर सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले :"शासनाचा वेळ आल्यावर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात होतो...
मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यता
News

मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यता

मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यतासोलापूर :ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ४६ महसूल मंडलांमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर असलेली कर्जवसुली थांबवून शेतीकर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. उद्या (बुधवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येत असून, या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्यातील तब्बल १६ लाख शेतकऱ्यांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी फक्त सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांकडेच २,७०० कोटींची थकबाकी असल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.पू...
UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णय
News

UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णय

UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णयनवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी लोक दैनंदिन व्यवहारांसाठी यूपीआय (UPI) चा वापर करतात. किराणा सामान घेणे असो वा ऑनलाईन शॉपिंग करणे, मोबाईलमधून फक्त काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होतात. मात्र, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आता ग्राहकांना बदल अनुभवावा लागणार आहे.1 ऑक्टोबर 2025 पासून UPI वरील P2P (पिअर-टू-पिअर) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा पूर्णपणे बंद केली जाणार आहे.काय आहे कलेक्ट रिक्वेस्ट सुविधा?UPI अॅप्स (PhonePe, Google Pay, Paytm इ.) द्वारे एखाद्या व्यक्तीकडून थेट पैसे मागण्यासाठी ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ पाठवता येत होती.उदाहरणार्थ, ₹500 मागायचे असल्यास रिक्वेस्ट पाठवली जात असे आणि समोरच्या व्यक्तीने UPI पिन टाकून ती मंजूर केली की पैसे खात्यात जमा ...
यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेत
News

यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेत

यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेतयवतमाळ, ढाणकी: यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी गावात धक्कादायक घटना घडली आहे. गुंडेकर कोचिंग क्लासेसचा शिक्षक संदेश गुंडेकर (वय 27) याने आपल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली.अत्याचार आणि गर्भधारणा लपवण्यासाठी आरोपी शिक्षकाने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, मात्र गोळ्यांचा डोस जास्त असल्यामुळे मुलीला प्रचंड रक्तस्त्राव झाला. गंभीर अवस्थेत तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर बिटरगाव पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला ...
अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
News

अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमखर्दा गावात रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न चांगलाच गंभीर झाला आहे. गावातील नागरिकांना मागील दोन वर्षांपासून उखडलेल्या रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अक्षय साबळे या तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी थेट साडी नेसून गांधीगिरी आंदोलन करत अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पोहोचून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या.दोन वर्षांपासून अपूर्ण पाइपलाइनचे कामगावामध्ये ईगल इन्फ्रा कंपनी पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम करत आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असले तरी आजतागायत पूर्ण झालेले नाही. पाइपलाइन घालण्यासाठी खोदलेले रस्ते मात्र दुरुस्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना चिखल, घसरगुंडी आणि वाहतुकीची अडचण भोगावी लागत आहे.ग्रामस्थांची दैन्यावस्...
कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
News

कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न

कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्नअमरावती (प्रतिनिधी) : कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 18 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कैदी कैलास (वय 40) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी ती ड्युटीवर असताना शौचालयात गेली होती. त्याचवेळी आरोपी कैद्याने शौचालयाचा दरवाजा ढकलून जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याने चुकीच्या नजरेने पाहत कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरो...