Sunday, February 1

News

नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्ज
News

नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्ज

नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्जनांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहितीलातूर, : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली. ​५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ८ मह...
‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशन
News

‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशन

‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशनअमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या ऐतिहासिक संघर्षाचे सखोल दस्तऐवजीकरण करणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंदोलन : एक क्रांतीपर्व” हा ग्रंथ प्रा. प्रकाश विश्वनाथ बोरकर यांनी लिहिला असून, गौरव प्रकाशन अमरावती यांनी तो प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता बडनेरा येथील सार्वजनिक कपिल मंडळ सभागृह, अशोक नगर, नवी वस्ती येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान इ. मो. नारनवरे (सुप्रसिद्ध साहित्यिक, नागपूर) राहणार असून, ग्रंथाचे प्रकाशन आयुष्यमान ताराचंद्र खांडेकर (फुले–आंबेडकर चळवळीचे भाष्यकार) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे....
स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभागात युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारांनी प्रचारात मारले मैदान, विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायक.!
News

स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभागात युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारांनी प्रचारात मारले मैदान, विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायक.!

स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभागात युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारांनी प्रचारात मारले मैदान, विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायकअमरावती | प्रतिनिधीअमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभाग क्रमांक 12 मध्ये युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. विकासाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, हाच मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.Oplus_131072या प्रभागातून युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार संजय भगवान माऊलकर, ऍडव्होकेट सौ. प्रीती हर्षल रेवणे (बनारसे), सौ. अर्चना गणेश तालन व निखिल उर्फ छोटू आकोटकर यांनी घराघरांत जाऊन, गल्लोगल्ली संपर्क साधत मतदारांशी थेट संवाद साधला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, आ...
सुरेखा तडाके यांचा तडाखा सीबीडी बेलापुरात भाजपला बसणार ?
News

सुरेखा तडाके यांचा तडाखा सीबीडी बेलापुरात भाजपला बसणार ?

सुरेखा तडाके यांचा तडाखा सीबीडी बेलापुरात भाजपला बसणार ?नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेतील प्रत्येक जागा भाजप ने प्रतिष्ट्येची केली असून आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सगळ्या जागा जिकूंन दाखवा! हा घरचा आहेर दिला आहेच.त्यात आमदार म्हात्रे याचं होम ग्राउंड असलेल्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून आमदार म्हात्रे यांच्या मर्जीतील एकही उमेदवार नसल्या मूळे विरोधकांना ही निवडणूक सोपी जाईल का? अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.प्रभाग क्रमांक अठ्ठावीस (अ )मधून खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )रंगणार आहे.तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )गटाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा आनंदा तडाखे यांची बाजू मजबूत असल्याच दिसून येत आहे. नुकतेच त्त्यांच्या प्रचारा साठी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रचार फेरी काढून वातावरण निर्मिती केल्याचं प्रभागात फिरल्यावर लक्षात ...
संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वावर ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
News

संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वावर ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वावर ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : संत परंपरेचा अमोल वारसा जपणाऱ्या श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त “श्री संताजी जगनाडे महाराज : संतत्व व कवित्व” या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आज (८ डिसेंबर २०२५) संताजी भवन, उषा कॉलनी, MIDC रोड येथे अत्यंत उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वसंत शंकरराव जामोदे (माजी उपकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून श्री शंकरराव हिंगासपुरे, श्री रंगराव भागवत, श्री रामेश्वर गोदे आणि श्री अण्णासाहेब नालसे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.प्रा. विजय जयसिंगपुरे यांनी संताजी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल मागोवा घेतलेले हे पुस्तक संताजी सेना बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या वतीने प्रकाशित ...
फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!
News

फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!

फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!‘हम तो फकीर हैं…’ असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनगटावर दिसणाऱ्या महागड्या घड्याळामुळे नवीन वाद उसळला आहे. त्यांच्या जुन्या भाषणांतील ‘फकीरी’ संदर्भातील वक्तव्ये सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असून, त्याच दरम्यान मोदींनी घातलेल्या घड्याळाची किंमत चर्चेचा विषय ठरली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान मोदी जाहीर कार्यक्रमांमध्ये एक खास घड्याळ परिधान करताना दिसत आहेत. हे घड्याळ ‘जयपूर वॉच कंपनी’ या भारतीय ब्रँडचे असून ‘Roman Bag’ या सिरीजमधील आहे. त्याची बाजारभावातील किंमत अंदाजे 55 ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे.या घड्याळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे डायलमध्ये बसवलेले 1947 सालचे एक रुपयाचे नाणे. या नाण्यावर ‘चालणारा वाघ’ कोरलेला असल्याने ते अत्यंत प्रीमियम आणि ऐतिहासिक मूल्य असलेले मानले जाते. या नाण्यामु...
नवरदेव गुपचूप करत होता दुसरं लग्न; पहिली बायको थेट मंडपात पोहोचली, राडा पाहून हवालदिल पाहुणे
News

नवरदेव गुपचूप करत होता दुसरं लग्न; पहिली बायको थेट मंडपात पोहोचली, राडा पाहून हवालदिल पाहुणे

नवरदेव गुपचूप करत होता दुसरं लग्न; पहिली बायको थेट मंडपात पोहोचली, राडा पाहून हवालदिल पाहुणेउत्तर प्रदेशात घडलेली ही घटना सोशल मीडियावर आगपाखड करत आहे. एक व्यक्ती पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या विवाहासाठी मंडपात पोहोचला. सर्व विधी सुरू असतानाच वधू-वरमाला समारंभाची तयारी सुरू होती. पण अचानक लग्नमंडपात धडक दिली ती नवरदेवाच्या पहिल्या पत्नीने आणि पुढे जे घडलं ते पाहून संपूर्ण मंडप हादरून गेला.मिळालेल्या माहितीनुसार, पहिली पत्नी काही नातेवाईकांसह थेट लग्नस्थळी पोहोचली. सुरुवातीला तिने नवऱ्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण नवरदेवाने संवाद टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने एकच गोंधळ घातला. साखरपुड्याचे सामान, वरमालेचे हार, खुर्च्यांचा आवाज क्षणात वातावरण गोंधळाने भरून गेलं.घटनास्थळी उपस्थित पाहुण्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांमधील वाद वाढतच गेला....
पुरुषांच्या वेदनेचा आवाज!
News

पुरुषांच्या वेदनेचा आवाज!

पुरुषांच्या वेदनेचा आवाज!मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओंचा पूर असतो. काही मनोरंजनात्मक, काही प्रेरणादायी तर काही मनाला चटका लावणारे. पण नुकताच व्हायरल झालेला बोरिवली स्टेशनवरील शांतपणे रडणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ मात्र लाखो लोकांच्या भावविश्वाला भिडत आहे. प्लॅटफॉर्मवरील एका बाकावर बसलेला तरुण हळूच डोळ्यांतून पाणी पुसताना दिसतो. त्याच्याभोवतीची गर्दी धावपळीत असली तरी त्या तरुणाच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना पाहून कोणीही थांबतंमनाने तरी.हा व्हिडिओ पाहताच अनेक पुरुषांनी सांगितलं “हो, आम्हालाही भावना आहेत… आम्हालाही रडू येतं.” समाजाने पुरुषांवर लादलेल्या "कणखर राहा", "पुरुष रडत नाहीत" या मानसिकतेला हा छोटा व्हिडिओ मोठ्ठा चापट मारतो.या व्हिडिओला मिळत असलेला प्रतिसाद हे सांगतो की व्यथा पुरुषांची असो वा महिलांची… अश्रूंचा रंग सारखाच असतो.● हे वाचा –आमची लक्ष्मी.!पुरुषांन...
साहित्यविश्व एकत्र आले… वाघ परिवारात मंगलमिलन.!
News

साहित्यविश्व एकत्र आले… वाघ परिवारात मंगलमिलन.!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील प्रसिद्ध कवी, लेखक, मुखपृष्ठ परीक्षक तथा साहित्यिक प्रशांत वाघ यांचे सुपुत्र प्रणित प्रशांत वाघ यांचा मंगल परिणय सोहळा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वा. ४० मिनिटांनी वैजापूर (जि. छ. संभाजीनगर) येथील द्रौपदी लॉन्स, मापारी वस्ती, नागपूर रोड येथे संपन्न होणार आहे. वधू पूजा प्रकाश शिनगारे ह्या अव्वलगाव (ता. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर) येथील प्रकाश कडूबा शिनगारे यांच्या कन्या आहेत.या सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिक प्रेमी, कलाकार, उद्योजक आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रमुख अतिथी तथा ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, अहिल्यानगर यांनी दिली आहे.साहित्यिक प्रशांत वाघ यांचा साहित्यसेवेचा गौरवशाली वारसागेल्या चार दशकांपासून कवी प्रशांत वाघ यांनी साहित्य, काव्यलेखन आणि समी...
आधार आता डिजिटल! एका फोनमध्ये ठेवा सर्वांचे कार्ड
News

आधार आता डिजिटल! एका फोनमध्ये ठेवा सर्वांचे कार्ड

आधार आता डिजिटल! एका फोनमध्ये ठेवा सर्वांचे कार्डनवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी नवे Aadhaar App लाँच केले आहे. या अ‍ॅपमुळे आता आधार कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही. एकाच मोबाईलमध्ये कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार कार्ड ठेवता येतात. मात्र यासाठी सर्व सदस्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक एकच असणे आवश्यक आहे.या अ‍ॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक आणि QR कोड शेअरिंग यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आहेत. त्यामुळे आधार डेटा अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपा झाला आहे. QR कोड स्कॅन करून बँक, कार्यालये किंवा अन्य ठिकाणी तत्काळ पडताळणी करता येते.UIDAI च्या या अ‍ॅपमुळे इंटरनेट नसतानाही सेव्ह केलेले आधार पाहता येतात. तसेच ‘ॲक्टिव्हिटी लॉग’मुळे आपला आधार कधी, कुठे वापरला गेला याची संपूर्ण माहिती मिळते.अ‍ॅप डाउनलोड करण्याची पद्धत:1️⃣ Google Play Sto...