Tuesday, June 2

Gerenal

Gerenal

दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम निवडताना..!

जर आपल्याला एखाद्या कारणावरून कॉलेजमध्ये जाता येत नसेल तर डिस्टन्स एज्युकेशन (दूरस्थ शिक्षण) हा एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. देशात आजघडीला ५0 लाखाहून अधिक विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. देशभरात ८00 हून सरकारी आणि अभिमत विद्यापीठ आहेत. यावरून दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व आणि व्याप्ती लक्षात येते. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेली पदवी नियमित पदवीप्रमाणेच असते. या पदवीचा उपयोग करिअरचा ग्राफ उंचावण्यासाठी करू शकतो. भारतातील अनेक भागात आजही जिलच्या ठिकाणी कॉलेज किंवा विद्यापीठ नाहीत. तेथे दूरस्थ शिक्षण उपयुक्त ठरत आहे. हे एक शिक्षणाचे लवचिक माध्यम मानले जाते. हा अभ्यासक्रम करताना विद्यार्थी आपले छंदही जोपासू शकतो किंवा जबाबदार्‍या व्यवस्थित पार पडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूरस्थ शिक्षण हे नोकरदार आणि व्यापार करणार्‍या मंडळींना, युवकांना उच्च शिक्षणाची ...
Gerenal

म्हातारपणाला दूर सारण्यासाठी..

धकाधकीच्या आयुष्यात लोक वेळेआधीच थकलेले फिल करू लागले आहेत. अशी तर याचे अनेक कारणे असू शकतात पण खरं कारण आहे ते म्हणजे तुमची जीवनशैली व सवयी. विज्ञानाच्या अनुसार रोजच्या जीवनातील काही सवयी आहेत ज्यामुळे तुमचे वय वेळेआधीच वाढते आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा बर्‍याच सवयी असतात ज्या आपल्या त्वचेवर सर्वात प्रथम परिणाम करतात. आपण अनुवांशिकदृष्ट्या आपल्यात असलेल्या गोष्टी बदलू शकत नाही पण तरूण आणि एनर्जेटिक दिसण्यात मदत करणार्‍या घटकांना नियंत्रित नक्कीच करू शकता.आठ वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की सिगारेट ओढल्यामुळे आपले वय जास्त दिसून येते. र्जनल ऑफ प्लॅस्टिक अँड रिकंस्ट्रक्टिव सर्जरीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात, हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी ७२ जुळ्या मुलांना समाविष्ट केले. धूम्रपान करणार्‍या मुलांच्या चेहर्‍यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली. धूम्रपान करणा...
Gerenal

व्यायाम करा घरच्या घरी

व्यायामाचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यात सातत्य असावं लागतं. अनेकांना जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. असं असेल तर घरच्या घरी करता येण्याजोग्या व्यायामावर भर द्यायला हवा. याविषयी.. स्ट्रेचिंग- घरी वर्क आउट करत असाल तर स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम प्रकार आहे. व्यायामाची सुरुवात स्ट्रेचिंगने करावी. यामुळे शरीर लवचिक बनून वर्क आउटसाठी तयार होते. पुश अप्स- पोटावर झोपा. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवा. हात आणि पंजे यांच्या सहाय्याने शरीर वर उचला आणि खाली आणा. पुश अप्समुळे खांद्यांना मजबुती मिळते. फ्री स्क्वेट्स- सरळ उभं राहून दोन्ही हात समोर ठेवावेत.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजगुडघ्यांवर थोडासा भार देऊन शरीराला खुर्चीवर बसतानाच्या स्थितीत आणा. कंबर सरळ ठेवा. काही काळ या स्थितीत राहून पूर्वपदावर या. हँड स्टँड- याला अधोमुख वक्रासन म्हणतात. रक्तदाबाचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी हा प्र...
Gerenal

बाबासाहेब लिहितात….✍️

"पैश्यांची फार कमतरता आहे त्यामुळे नवीन पुस्तके विकत घेण्याइतकी क्षमता नाही. -पण ज्ञानाची भूक एवढी तीव्र आहे. सध्या मुरंबा लावलेला पाव _त्या पावाचे दोन चार तुकडे करून उदरनिर्वाह करतो. ग्रंथालयात खाण्यावर बंदी आहे. -पण वेळ मिळताच मी कोणाच लक्ष नसताना ते खातोय. सकाळ झाली की "ग्रंथालयात केव्हा संध्याकाळ उलटते कळत नाही. काही पुस्तकांची पाने वाचायची राहिले की ती रुखरुख जीवाला लागते. मी पान क्र लक्षात घेऊन पुनश्च उद्या सकाळी ते पुस्तक वाचायला घेतो. -खूप जबाबदारी आहे. माझा शैक्षणिक उद्देश हा एकमात्र आहे. तो म्हणजे प्रचंड ज्ञानसाधना. पुस्तकात रमल्यानंतर कशाचं भान उरत नाही. पुस्तकांची पाने चाळताना मला कसलाच बाहेरचा गोंगाट ऐकू येत नाही. भूक सतावत नाही. तहान ही फारशी लागत नाही. संध्याकाळी एकवेळच जेवण घेतो. "जेवण फार मोजक असत. अगदी जगण्यासाठी लागेल इतकंच. "भाकरीची फार आठवण येते. -पावाचा तुकडा खाताना ग...
Gerenal

कितने अजीब रिश्ते है यहाँ पे !

“मुंबईत राहून राजगृह पाहिलं नाही तू...? चल मी घेऊन जाते“ असं म्हणून संगीता मला दादरला घेऊन गेली. राजगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचताच एरव्ही सर्वसामान्यांसाठी खुले असलेले सभागृह त्यादिवशी बंद होते. राजगुहाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी कुणालाही प्रवेश नव्हता. दोघीही निराश झालो. परतीचा विचार सुरु केला. असं म्हणतात, “विश्वास दृढ झाला की, निष्ठा येते. निष्ठा दृढ झाली कि श्रद्धा. श्रद्धा दृढ झाली की, भक्ती आणि भक्तीही दृढ झाली की समर्पिता.” याच समर्पित दृढ भावनेनं संगीता एकटीच राजगृहाच्या वरच्या मजल्यावर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परपोतीला घेऊन खाली आली. त्यादिवशी मी केवळ संगीतामुळे राजगृहापर्यंत पोहचले पण राजगृह पाहण्याची ईच्छा मात्र अपुर्णच राहिली.2014 साली आम्ही 11 जण एकाचवेळी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रूजू झालो. त्यानंतर अनेक सहकारी बदलीमुळे वेगवेगळ्या जिल्ह्या...
Gerenal

सम्राट अशोक : एक श्रेष्ठ तम सम्राट

       इतिहासाच्या पानापानांवर परिच्छेदा च्या परिच्छेदांवर गर्दी करून असणाऱ्या लक्षावछधी राजांच्या नावामध्ये, सम्राट अशोकाचे एकट्याचेच नाव एखाद्या तळपत्या तार् यासारखे चकाचक राहते, अशोकाचे हे वेगळेपण असामान्य आहे, अलैकिक आहे. हेच आपण नेमके समजावून घेतले पाहिजे, कलिंगच्या लढाईनंतर त्याच्या व्यक्ती मत्वात झालेल्या अमूलाग्र बदल हेच त्यांच्या वेगळेपणाचे गमक आहे, शत्रुपक्षाची प्राणहानी, वित्तहानी पाहून सामान्यतः पराक्रमी राजे आपली पाठ थोपटून घेतात, यशाने उन्मत्त होतात, सम्राट अशोक राजा असा सामान्य राजासारखा उन्मत्त झाला नाही, त्याने शांतपणे विचार केला, प्राणहानीने, वित्तहानीने तो व्यथित झाला आणि हिंसेचा मार्ग अवलंबल्याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला. त्याने हिंसेचा मार्ग सोडला असे हे राजाने वागणे. हेच त्यांच्या असामान्य पणाचे अलैकिक करुणामय होणे होय. म्हणजे मानवी मनाला स्पर्श करून त्यांचे दुख स्वत...
Gerenal

महिला सक्षमीकरणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाची विविध पैलू आहेत.एक महान समाज क्रांतिकारक,शिक्षणतज्ञ अर्थतज्ञ,परराष्ट्र नितीतज्ञ म्हणून भारताच्या जडणघडणीत त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण असे योगदान आहे.विसाव्या शतकातील सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचे मुख्य प्रणेते असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महिला सक्षमीकरणासाठी ही तितकेच महत्वपूर्ण असे योगदान आहे.शोषित,पीडित,वंचित घटकाच्या उद्धाराबरोबरच महिलाच्या उत्कर्षासाठीही त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले,त्यांच्या हक्कासाठी पोटतिडकीने लढलेत,झटलेत, झिजलेत.सर्वधर्मीय महिलांना त्यांच्या अधिकार व हक्काची जाणीव करून दिली.अधिकार व हक्काच्या लढाईसाठी प्रेरित केले. सर्वांगीण विकासाची वाट मोकळी करून दिली.डॉ.आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजच्या समस्त महिला वर्गाच्या आयुष्यात सोनियाचा दिवस उगवला हे सूर्यप्रकाशाइतके सत्य कुणीच नाकारणार नाही. भारतातील वर्णव्यवस्था...
Gerenal

आधुनिक भारताचे शिल्पकार

भारतातील वर्ग आणि जातीअंताच्या लढय़ाला आकार व दिशा देण्याचे भरीव काम विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढय़ांमध्येही डॉ. बाबासाहेब प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान देणार्‍या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान अग्रणी आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषत: वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकारासाठी त्यांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता. लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. डॉ. बाबासाहेबांना बालपणापासून अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. इ.स.१९३५-३६ या कालावधीदरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत त्यांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटू अनु...
Gerenal

“भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे विचार अन्यायग्रस्तांसाठी -“तेज – प्रकाश निर्माण करणारे”

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट करून ज्ञानसाधना करून अनेक विषयात ज्ञानशांखावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले याद्वारे त्यांनी स्वतःची शैक्षणिक उन्नती तर साधलीच अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी मोलाचे अतुलनीय कार्य केले अशा लोकांसाठी त्यांनी त्यांच्यामध्ये चेतना,जागृती निर्माण करण्यासाठी विपुल लिखाण केले. जातीपातीचा विचार न करता सर्वांसाठी मानव कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. स्रियांच्या सन्मानासाठी केलेल्या कार्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करायलाच पाहिजे. *"वाचाल तर वाचाल,"* असा संदेश बाबासाहेबांनी दिल्यामुळे आज अन्यायग्रत्तांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला भारतरत्न बाबासाहेबांनी शिकविले. अन्यायग्रस्ताच्या वाट्याला आलेले दुःखे ...
Gerenal

मुलांच्या पाठदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका…..

पाठदुखीची समस्या सर्वसामान्य बाब बनली असून आता ती लहानग्यांनाही सतावू लागली आहे. निरोगी जीवनशैली, बसण्याची योग्य स्थिती आणि सर्वसाधारण व्यायाम करून पाठदुखी जडण्याची शक्यता बर्‍याच अंशी कमी करता येते. लहान मुलांमधल्या पाठ तसंच मानदुखीची अनेक कारणं असू शकतात. म्हणूनच मुलांच्या पाठदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. शाळेत बराच काळ बसून राहणं, गॅझेट्सचा वापर करताना चुकीच्या पद्धतीने बसणं, शारीरिक हालचालीचा अभाव अशा कारणांमुळे पाठदुखी उद्भवू शकते. जड दप्तरामुळेही मुलांमध्ये पाठदुखी उद्भवत असल्याची बाब समोर आली होती.लहानग्यांमधली प्रत्येक प्रकारची पाठदुखी गंभीर स्वरूपाची नसते. अगदी साधे उपाय करून हा त्रास दूर करता येतो. त्यामुळे पालकांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे बैठी जीवनशैली आणि बसण्याची अयोग्य पद्धत ही पाठदुखीची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे मुलांना साधे व्यायामप्...