पोट कमी करायचेय?
लहान मुलांमध्ये अँलर्जीचे प्रमाण सध्या बरेच वाढतेय. ठराविक अन्नपदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. दाणे, अंडी, गाईच्या दुधातून मिळणारी प्रथिनं आणि मासे या घटकांमुळे अँलर्जी होण्याची शक्यता असते. या अँलर्जीची वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. अंगावर पुरळ उठणं, मळमळ, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणं दिसून येतात. अँलर्जी असलेले अन्नपदार्थ टाळणं हा यावरील सर्वोत्तम उपाय मानला जातो. अनेक मुलांमध्ये प्रौढपणी ही समस्या दूर झालेली असते. पण अनेक माता आपल्या मुलांना असे पदार्थ देणं टाळतात. पण मुलांना लहान वयात हे पदार्थ खायला दिले तर अँलर्जीची समस्या दूर होऊ शकते, असं एका संशोधनातून समोर आलंय. अगदी तीन महिन्यांच्या बाळाला असे पदार्थ खायला दिल्यास अँलर्जीची समस्या मोठेपणी दूर होऊ शकते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया संशोधनात स्तनपानावर अवलंबून असलेल्या तीन महिन्यांच्या लहानग्यांचा...