तरुणाईचा उद्रेक
वर्तमानाचे कालचक्र अत्यंत वेगाने बदलत आहे. जग एक ग्लोबल खेडे बनू पाहत असताना तरुणाईचा भारत देश तरुणाला उध्वस्त करत आहे. तरुणाईच्या क्रांतीने देशाने अभूतपूर्व अशी क्रांती केली आहे. त्या तरुणाला धार्मिक व जातीय वातावरणात मशगूल ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आज दिसत आहे. तरुण हा देशाचा कर्णधार असतो. तरुणाच्या ओठावरील गीतांमधून देशाचे भविष्य उमलत असते.पण हाच तरुण आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. काही तरुण हे धर्माधिष्ठित व जातीधिष्ठित दिसत असले, तरी अनेक तरुण हे भारताचे खरे शिलेदार आहेत. आपल्या ज्ञानक्रांतीतून ते देशाला शिखरावर घेऊन जात आहेत. मात्र आज शिक्षण घेणारे अनेक तरुण बेरोजगार आहेत . त्यांना योग्य रोजगार सरकार उपलब्ध देऊ शकत नाही.सरकारी सेवा क्षेत्रात अघोषित नोकरीबंदी करून त्यांच्या जीवन मेटाकुटीला आणले आहे. एखादी जाहिरात निघाली तर तिचा निकाल योग्यप्रकारे लागत नाही. अनेक परीक्षांम...