भारतीय ज्ञानक्रांतीचे जनक : राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले
महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म ११एप्रिल १८२७ ला सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.गोविंदरावांना उदरनिर्वाहासाठी अहोरात्र झगडावे लागेल. त्यांनी पुण्याला येऊन भाजीपाल्याचा व फुलांचा व्यवसाय केला .त्यांचे उपनाव गो-हे होते. पण फुलांचा व्यवसाय मुळे लोक त्यांना फुले म्हणू लागले.
तो काळ अतिशय धकाधकीचा होता. परकीय सत्ता भारतात राज्य करीत होती. तसेच भारतातील समाजव्यवस्था विषमतेने बरबटली होती. सारीकडे अन्यायाचा आगडोब भरला होता. अशा कठीण परिस्थितीत गोविंदरावांनी मुलाला १८४१ला एका स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत घातले तेव्हा. ते चौदा वर्षांचे होते. या शाळेत खऱ्या अर्थाने ज्योतिरावांना मानवतावादाचे शिक्षण मिळाले.
समाजव्यवस्थेचे दहाक चित्र समजले अस्पृश्यतेच्या हाल-अपेष्टा शुद्राचे कष्ट...