लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती
वाचाल तर वाचाल, हे माझे बाबा सांगायचे. माझे आई बाबा वाचनाचे मोठे भोक्ते होते व त्याचमुळे लहानपणापासून आम्हाला ही वाचनाची गोडी लागली. अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीची पुस्तके घालून वाचत होतो व त्या करता ओरडा ही खाल्ला होता. चांदोबा, गोड गोड गोष्टी, परी कथा, श्यामचीआई, दिवाळी अंक, कांदबऱ्या इत्यादी गुपचूप शाळेत असताना वाचत होतो. इंग्रजी शाळेत होतो, घरी कोंकणी बोलत होतो. मराठी थोडी मोडकी तोडकी येत होती. पण एक मात्र नक्की की मराठी भाषे बद्द्ल आपुलकी वाटत होती. मातृभाषा म्हणून मराठी लावत होतो ना, त्यामुळे असेल.
लहानपणी मैत्रिणींकडे पुस्तकांची देवाण घेवाण करत होतो, आताही करतो. माझी आवड माझ्या दोन्ही मुलींनी ही घेतली. एखाद्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर 'चि. .......यांस, वाढदिवसा निमित्त सप्रेम भेट व पुढे लिहिलेली तारीख हे वाचायला किती छान वाटत होतं. खूप वर्षांनी ते पुस्तक हाती आलं की, ते दिलेली ...