डॉक्टरकीच्या स्वप्नातील विद्यार्थ्यांचे पाऊल आयुर्वेद व होमिओपॅथीकडे…
* आता आयुर्वेदालाच प्रचंड मागणी
राज्यातील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची भुरळ पडली आहे. एमबीबीएस नंतर आयुर्वेदालाच विद्यार्थ्यांची पसंती, तर होमिओपॅथीकडेही कल वाढत चालला आहे. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती. मात्र, आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. बारावीनंतर निट युजी परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं. म्हणून देशभरातील लाखो विद्यार्थी निट ची तयारी करत असतात. मात्र सर्वांनाच एमबीबीएस ला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणून काही विद्यार्थी आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा डेंटल क्षेत्रात डॉक्टर होतात. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेद क्षेत्रामध्ये येणा-या कंपन्या आणि या क्षेत्राला...