गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा
गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसादिवाळी हा भारतीय संस्कृतीत समृद्धी, आनंद आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. मात्र गोरबंजारा समाजातील ‘दवाळी’ ही फक्त एक सण म्हणून नव्हे तर सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सणाचे संदर्भ विधी, लोकगीते आणि परंपरा, समाजाच्या भटक्या इतिहासाशी, निसर्गाशी आणि सामूहिक जीवनाशी घट्ट जोडले गेलेले आहेत.गोरबंजारांची ‘दवाळी’ दोन दिवसांची असली तरी तिचा आशय शतकानुशतकांचा सांस्कृतिक वारसा सांगतो. पहिल्या दिवशी कुमारिका मुली परंपरेनुसार घराघरांत जाऊन दिवा घेऊन ‘मेऱा’ च्या रुपाने थोरामोठ्यांचे शुभचिंतन करतात आणि पारंपरिक गीतांद्वारे समृद्धीचे आशीर्वचन मागतात. या विधीत समाजातील स्त्रीशक्ती आणि एकात्मतेची जाणीव स्पष्ट दिसते. दुसऱ्या दिवशी पार पडणारी ‘गोधन पूजा’ पशुधन आणि निसर्गाबद्दल गोरबंजारांचा कृतज्ञतेचा उत्सव ठरतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी होणारी ह...









