Tuesday, March 10

Article

फेक कॉलपासून सावधान.!
Article

फेक कॉलपासून सावधान.!

फेक कॉलपासून सावधान.!जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फेक कॉल येत असतील तर तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण काही लोक तुम्हाला फेक कॉल करून फसवू शकतात आणि तुमचे बँक डिटेल्स घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. सायबर दरोडेखोराचा एक कॉल तुमचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला फेक कॉल येतो तेव्हा तुम्ही सावध राहावे. याच्या मदतीने तुम्ही सायबर फसवणूक टाळू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्या फोनमध्ये 2G, 3G किंवा 4G सिम अपग्रेड करण्याचा कॉल येत असेल किंवा तुमची मुलगी,मुलगा सेक्स रॅकेट मद्ये फसला गेला आहे.. त्याला सोडायचे असेल तर लाखो रुपयांची मागणी करणारे कॉल आला तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. हा एक बनावट कॉल असू शकतो, ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात. किंवा एक कॉल च्य...
ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा
Article

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमाफार पुर्वीचा काळ.गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा.आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते.काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत.त्यामुळे त्यांचे गावी येणे जाणे असे.ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक रानभाज्या आळवडीची पाने,करटुली,चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत.तसेच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.त्याबरोबर चहापावडर, एखाद डझन कपड्याचे / अंगाचे साबण,...
श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण
Article

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहणवयाच्या तेविसाव्या वर्षी पहिली गझल लिहिणारे मराठी गझल साहित्यातील प्रख्यात श्रेष्ठ नामवंत गझलकार आदरणीय राऊत सरांची देवप्रिया / कालगंगा अक्षर गण वृत्तातली ही गझल मला खूप आवडल्याने मी ह्या गझलेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे.गझलओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझलत्या खळीच्या भोवऱ्याने जीव माझा घेतला बोलताना मोकळे ती हासली गाली गझलतू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझलहिंडतो का जागजागी तू अनाथासारखा भंगलेल्या माणसांची ती खरी वाली गझलजन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे एक प्याला अंगुराचा, एक ही साली गझलपोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल - श्रीकृष्ण राऊतआदरणीय राऊत सरांच्या ह्या गझलेचा मतलाच एवढा सुंदर नि नवयुवती समान आकर्षक आहे की ...
पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.!
Article

पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.!

पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.! बारवाड, ता निपाणी जि बेळगाव कर्नाटक येथील मराठी भाषिक कवी रंगराव बन्ने , यांचा “आस तुझी रे लागली” हा पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तिरसात चिंब भिजलेला अभंग संग्रह नुकताच वाचनात आला. विविध अभंगातून त्यांनी भगवंताच्या प्रती आपली भक्ती व्यक्त केली आहे. “आस तुझी रे लागली” या अभंग कलाकृतीचे मुखपृष्ठ अतिशय सुबक आणि अर्थपूर्ण असून या मुखपृष्ठाला एक वैश्विक अर्थ प्राप्त झाला आहे. मानवी जीवनाचा व्यापक अर्थ या मुखपृष्ठावरून आपल्याला दिसून येतो. आज आपण या मुखपृष्ठावरील संदर्भाचा मानवी जीवनाशी कसा संबंध जोडला गेला याचा अभ्यास करणार आहोत.“आस तुझी रे लागली” या अभंग संग्रहाच्या मुखपृष्ठावर गगनाला भिडणारी पांडुरंगाची उंच मूर्ती दाखवली आहे, या पांडुरंगाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळावा रस्त्याने जातांना दाखवला आहे तर एक वयोवृद्ध म्हातारा काठी टेकवत, पाठीवर गाठोडे, का...
साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!
Article

साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!

साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!साहित्य ही बाब प्रत्येक वेळी सहज निर्माण होत नाही. त्यासाठी आपल्या मनातील भावना, वैचारिक पातळी, योगायोग या गोष्टींना फार महत्त्व आहे. आपण एखाद्या गोष्टीला जसे जाणून बुजून घडवून आणू शकत नाही. तसेच, चांगल्या साहित्याची निर्मिती केवळ खेचून ताणून निर्माण होऊ शकत नाही.एखादी कविता आपण लिहित असताना त्या कवितेमध्ये आशय गर्भता, हळुवारपणा, सहजता, चंचलता येण्यासाठी अनुभव, शब्दरचना, शब्दसंपदा, अलंकार यांची सुयोग्य निवड कवितेला मोकळे रान मिळवून देते. पण तरीही हा विचार अचानकपणे समोर आल्यावर तीच रचना अगदी साध्या भाषेत गोड वाटू लागते. साहित्य लिहिण्याची एक नैसर्गिक उर्मी असते. तुम्ही कुणाला घाबरवून, भीती दाखवून साहित्य निर्मिती करू शकत नाही. तसे साहित्य निर्माण होईल पण, ते साहित्य मनाला स्पर्श करणार नाही. त्या साहित्यामध्ये जिवंतपणा नसेल. जसे आपण म्हणतो मूर्त...
पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’-नंगारा म्युझियम
Article

पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’-नंगारा म्युझियम

पोहरादेवी येथे 'बंजारा विरासत'-नंगारा म्युझियम* पोहरादेवी येथे 'बंजारा विरासत'-नंगारा म्युझियमचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा… * नंगारा म्युझियम विषयी सविस्तर माहिती * संत सेवालाल महाराजांची विख्यात भविष्यवाणी "मार पालेर खुटा मच रोपलीव'' _________________________________ आपण सर्वांना जय सेवालाल..🙏 दि. 03 डिसेंबर 2018 ला संत सेवालाल नंगारा वास्तू भूमिपूजन सोहळा प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमाची कायम नोंद लेखनीतुन व्हावी म्हणून "हुंमाळो नंगारारो" ही ISBN कृत स्मरणिका (Souvenir) संपादित करण्याचे भाग्य मला लाभले. श्री. तेजुसिंग पवार साहेब (अप्पर जिल्हाधिकारी) यांनी "नंगारा म्युझियम" अर्थात "संत सेवालाल सागर संग्रहालय " प्रकल्प अभ्यास अहवाल स्मरणिकेत प्रस्तुत केला. त्यातील उल्लेखनीय बाबी ह्या संपादित केलेल्या स्मरणिकेतील माहितीच्या आधारे बणजारा समुदायाची ऐतिहासिक व स...
बाप आहे म्हणून…..
Article

बाप आहे म्हणून…..

बाप आहे म्हणून…..काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो. माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते.तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते.एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता.मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय..”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस..? “ मी म्हणलं, पुण्यात आहे. अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे. अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा पोटाला..? मी होय म्हणलं..अण्णांनी फोन ठेवला.. आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला..मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाल...
आई, कर्ज भाकरीचे!
Article

आई, कर्ज भाकरीचे!

आई, कर्ज भाकरीचे!बायको सतत आईवर आरोप करत होती..!! आणि नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता..!!पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती, "मी अंगठी टेबलवरच ठेवली होती आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..! अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली आहे असा आरोप तिचा.पण गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..! तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं.. पत्नीला ती चापट सहन झाली नाही. ती घर सोडून चालली आणि जाता जाता पतीला तिनं एक प्रश्न विचारला कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का..??तेव्हा पति ने उत्तर दिले त्या उत्तराला ऐकून दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले तो क्षण..!! पति ने पत्नी ला सांगितले..!"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मा...
बायको म्हणजे कोण?
Article

बायको म्हणजे कोण?

बायको म्हणजे कोण? बायको ह्या शब्दाला जर फोडले तर “बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी “य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि “को” म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी ! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात! मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल. ● हे वाचा –मी भारत माता बोलतेय बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं ! प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ! हातात भक्कम हात!!! समजून घेणार हृदय ! इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी ! एक जवळचा मित्र !!! आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल...
ग्रामीण भागातील चुलीवरची भाकर
Article

ग्रामीण भागातील चुलीवरची भाकर

ग्रामीण भागातील चुलीवरची भाकरभारतीय ग्रामीण संस्कृतीत चुलीवरची भाकर एक अत्यंत महत्त्वाची स्थान आहे. ही भाकर केवळ आहाराचा भाग नाही तर ती एक सांस्कृतिक प्रतीक आहे. ग्रामीण भागात, घराघरात चुलीवर भाकर तयार करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे स्थानिकता, साधेपणा आणि शेतकरी जीवनशैलीचे दर्शन होते.भाकर बनवण्याची प्रक्रिया : भाकर बनवण्यासाठी साधारणतः ज्वारीचे पीठ,गरम पाणी आणि थोडे मीठ लागते. कडवट तापलेल्या चुलीवर ओल्या हातांनी पीठ गूंठले जाते आणि नंतर त्याची गोळे करून थापली जाते. चुलीत आग लागल्यानंतर, भाकरी तोंडावर ठेवली जाते. ही प्रक्रिया साधी असली तरीही तिच्यामागे अनेक कौशल्ये आणि अनुभव दडलेले असतात.चुलीचं महत्त्व : चुलीवरची भाकर तयार करताना ज्या चुलीचा वापर केला जातो, ती ग्रामीण जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. चुलीवर जेव्हा भाकरी तयार केली जाते तेंव्हा तिच्यातून येणारा सुवास, थर्मल ऊर्जा आणि तापमाना...