बुद्धा…
तुझ्यापुढे थिट्या पडतात
सगळ्याच प्रतिमा प्रतिकं…!
तुला पाहिल्यानंतर
शब्दांच्याही पलिकडचं
अलौकिक असं काहीतरी
अनुभवायला येतं…!
आणि-
तुझं शांत शितल आणि
अपार सुखदायी अस्तित्व
माझ्या व्यथा वेदनांवर
हळुवार फुंकर घालत
अपार कारूण्यानं
मला कवेत घेतं…!
– संदीप वाकोडे