
पुरुषांच्या वेदनेचा आवाज!
मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओंचा पूर असतो. काही मनोरंजनात्मक, काही प्रेरणादायी तर काही मनाला चटका लावणारे. पण नुकताच व्हायरल झालेला बोरिवली स्टेशनवरील शांतपणे रडणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ मात्र लाखो लोकांच्या भावविश्वाला भिडत आहे. प्लॅटफॉर्मवरील एका बाकावर बसलेला तरुण हळूच डोळ्यांतून पाणी पुसताना दिसतो. त्याच्याभोवतीची गर्दी धावपळीत असली तरी त्या तरुणाच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना पाहून कोणीही थांबतंमनाने तरी.
हा व्हिडिओ पाहताच अनेक पुरुषांनी सांगितलं “हो, आम्हालाही भावना आहेत… आम्हालाही रडू येतं.” समाजाने पुरुषांवर लादलेल्या “कणखर राहा”, “पुरुष रडत नाहीत” या मानसिकतेला हा छोटा व्हिडिओ मोठ्ठा चापट मारतो.
या व्हिडिओला मिळत असलेला प्रतिसाद हे सांगतो की व्यथा पुरुषांची असो वा महिलांची… अश्रूंचा रंग सारखाच असतो.
(फोटो सौजन्य – tilakdevdubey/Instagram)