Saturday, March 21

Blog

Article

प्रगल्भ जाणिवेतून साकारलेली डॉ. विशाल इंगोले यांची कविता ; ‘माझा हयातीचा दाखला’

कवी व्यासंगाच्या उद्यानात विचारांची फुले वेचून मौनाच्या गुंफेत बसून त्याचे गजरे करीत असतो. अगदी याचप्रमाणे कवीची कविता कागदावर उतरत असते. कविता हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नाही, तर वास्तवाला स्पर्श करुन मानवी भावभावनांचा कल्लोळ आपल्या काळजापर्यंत पोहोचवण्याचे एक सकस आणि सशक्त माध्यम असते. कविता समाजदृष्ट्या प्रभावी तेव्हाच होते जेव्हा तिला वैचारिकतिचे तात्त्विक अधिष्ठान लाभते. कवीच्या वाट्याला आलेले संघर्षमय आयुष्य जेव्हा एखादा कवी नेमक्या, मार्मिक, भाषाशैली द्वारे मांडतो तेव्हा ती कविता सामाजिक उद्रेक घेऊन जन्माला येते. सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारते. याच प्रगल्भ जाणिवेतून डॉ विशाल इंगोले यांचा *माझा हयातीचा दाखला* हा कवितासंग्रह आकारास आला आहे.प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या समीक्षा लेखनास विलंबच झाला कारण शब्दसृष्टीतील नेमकी कोणती शब्दफुले संग्रहास अर्पण करावीत या प्रश्नाच्या आवर्तात माझी सा...
Story

कुंकवाचा धनी…!

पेढी नदीच्या काठावर वसलेलं एक गाव होतं, डोंगर-दऱ्याच्या माथ्यावरुन सूर्यनारायण डोकावत होता, कोंबड्याची बाग ऐकून शेवंता उठली, डोळे पुशीत तिनं चुलीत लाकडं लावली अर्धा कप चहा घेतला, तोवर  कमलाचा आवाज आला "शेवंते कुठे आहेस वं! झालं  नाही का बाप्पा"... शेवंतानं झपाट्यानं आपलं कामं उरकवलं. "हो तुम्ही व्हा समोर, मी येतोच मागूनं" असं म्हणत शेवंतानं आपली शिदोरी बांधली, अन निंघाली कमलासोबत कामाले. कमला तिच्या सोबत बोलत होती, पण शेवंताच्या डोक्यात ईचाराचं कावूर माजलं होतं. "काय वं शेवंते, दोन दिवसांच्या भांड्याचा होका आहे, चालशीन काय वं ? शेवंताची तंद्री तुटली हो हो ,माय चालू नाही तं सांगू कोणाले मले थोडं  राणीवाणी घरात बसता येते, रातंदिस काम केल्या बिगर तीन-तीन पोरी थोड्याच उजयाच्या राहिल्या. "बालीच्या बापाले कायी कराले लाव नं, तो काय निरा पसरलाच रायते काय ?" जाऊ देनं माय!, काय करतं कर्माचे भोग हाये...
Article

यशवंत अन् स्मशानातलं जेवण..!

नेहमीच हसत राहणारा यशवंत माझा फारच जवळचा नातेवाईक होता. त्याची आई आणि माझे बाबा सख्खे मावस-बहीण भाऊ होते. नातेवाईक, शेजारी, आणि समवयस्क असल्याने आमचं बालपण सोबतच गेलं.तसं पाहिलं तर १९५६ च्या दरम्यान तुळसाबाईचे लग्न धानोरा ताथोड तालुका कारंजा येथील किसन गडलिंग यांच्याशी झाले होते. किसन सुद्धा मूळचा धानोर्याचा नव्हताच, कारण त्याचे सर्व नातलग अमरावती जिल्ह्यातील होते. त्यांचे मामा धानोर्याचे होते. मामाच्या आधाराने ते धानोर्याला आले होते. आणि लग्नानंतर किसन गडलिंग आपली सासू शेवंताबाई धवणेकडे राहायला आले होते. शेवंताबाई म्हणजे किसन वानखडेची सख्खी आत्या व माझ्या वडिलांची मावशी होती. सुरुवातीला माझ्या घराला लागूनच त्यांचं झोपडं होतं. परंतु १९७० च्या दरम्यान ते चौधरीच्या निंबावाल्या आवारात राहायला गेले, नंतर चिंचेखालच्या चौधरी यांच्या आवारात राहायला आला. (हनुमान मंदिरासमोरच्या) तेथेच शेवंताबुडी आण...
Article

‘स्त्री मनाची घुसमट : काल आणि आज’

'आई' हा शब्दच् मुलांसाठी सर्वांग सुंदर असतो. त्या शब्दाला कशाचीच् उपमा देऊ शकत नाही. मुले ही आई या शब्दातच संपूर्ण विश्व बघत असतात. तिच्या मायेत, तिच्या वात्सल्य छायेत ते वाढत असतात. तिचा प्रत्येक शब्द मुलांचे बालपण घडवत असतात. बालमनावर संस्कार करणारी 'ती' माऊली जगाच्या जडण-घडणीचा पाया असते. आई हीच् मुलांची प्रथम गुरू मानली जाते.योग्य संस्कार देऊन ती मुलांचे भविष्य घडवीत असते. संस्कार हा शब्दचं असा आहे की,  तो माणसाला योग्य मार्ग दाखवित असतो. तिथे दूर दूर पर्यंत विकृतीला मनात थारा नसतो. मनावर झालेले संस्कार आयुष्यभराची शिदोरी म्हणून माणसाला प्रत्येक मार्गावर सोबत असते. आज काळ बदलला, विचार बदलले ; त्याचबरोबर आई पण आधुनिक विचार सरणीची झाली.परंतु कधीकाळी तिच्यातील अबला म्हणून वावरणारी स्त्री आज बदलली असली तरी, तिच्यातील संस्कारी आई अजूनही बदललेली नाही. तिला सुद्धा वाटते की, मी फक्त माझ्या...
Article

हाताला काम द्या ; पोटाला अन्न द्या..!

"धैर्य समस्त शक्तियों और आनंद का मूल है।धैर्यवान व्यक्ती कभी भी नाकामयाबी से निराश नही होता।बल्कि हर असफलता उसे और अधिक प्रेरित करती है।अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए इतिहास में एेसे कोई उदाहरण नही है ।जब आदमी के धैर्यपूर्ण प्रयत्न कभी असफल हुए हो । उतावलापण और कामयाबी एक दुसरे के प्रतिककुल भाव है।सफलता जल्दबाजी में नही मिलती और जल्दबाजी में मिली सफलता कभी स्थायी नही होती।"     -जान रस्कीन    आज कोरोनाच्या महामारीने सारे क्षेत्र उध्दवस्त झाले आहेत.जे माणसे कामावर होते त्यांना कामावरून कमी केले आहे.छोटे उद्याेगधंदे लयास जात आहे.शिक्षण घेतलेली मुले जीवनाविषयी बैचन आहेत.सरकारी नौकरी बंद आहे.खाजगी कंपण्यात रोजगार नाही . माणसाचे जीवन भयग्रस्त झाले आहे.त्यात शासनाने जे आदेश काढले त्यांनी त्यांचे कंबरडेच मोडून गेले आहे.शिक्षणाच्या वाटा बंदिस्त होऊन गेल्या आहेत.अशा वातावरणात राजकिय खेळी सुरू...
Story

आयुष्यातील हार..!

" मी जगदीश महाजन. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फाँरेन टूर आहे" बँकाँकच्या हाँटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करुन दिली."साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करुन दिलीये." आमचा ग्रुप लिडर सर्वांना सांगू लागला. "तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खुप जवळचे संबंध आहेत. आमदार, खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते"सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं. हळूहळू सगळे आपला परीचय करुन देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नव्हतं."मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. म...
Article

बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी प्रा. रमेश वरघट सर

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात डोंगराळ भागातील करजगाव अत्यंत गरीब कुटुंबात प्रा. रमेश वरघट सरांचा जन्म झाला. आई बाबा दोघेही निरक्षर होते. पण आपला मुलगा शिकावा, चांगला मोठा व्हावा. असं राधा-कृष्ण या जोडप्याला मनातून वाटे. म्हणून राबराब राबून त्यांनी मुलाला शाळेत घातलं. त्यांचं सातवीपर्यंतचे शिक्षण अत्यंत हलाखीत गावातच झालं. हायस्कूलचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल दारव्हा येथे पूर्ण केले. त्यावेळी ते कोरे वसतिगृहात राहायचे. नववी पास झाल्यानंतर काही काळ त्यांच्या शिक्षणात खंड सुद्धा पडला होता. पण श्री एन. के. निमकर सर तसेच त्यांचा बालमित्र विष्णू तवकार यांच्यामुळे पुन्हा त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि ते मॅट्रिक द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झालं .महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अनेकदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. घरची गरिबी व अत्यल्...
Gerenal

साडीसाठी परकर खरेदी करताना

साडीसाठी परकर खरेदी करताना रंगांची पूर्ण काळजी घ्या. परकर घेताना साडी सोबत न्या. रंग नीट जुळवून मगच परकर खरेदी करा. * योग्य आकाराचा परकर घेतल्यास साडीत उंच आणि सडपातळ दिसणं शक्य होतं. म्हणूनच फटिंगच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. * परकर टाचेच्या दोन इंच वर असायला हवा. * साडीच्या कापडानुसार परकर निवडा. कमी वजनाच्या साडीसोबत थोडा जाड परकर शोभून दिसतो तर जाड कपड्याच्या साडीत पातळ परकर शोभून दिसतो.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज...
Gerenal

हेडफोन की इअरफोन..?

सध्या सगळीकडे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मुलांच्या शाळा-कॉलेजही ऑनलाईन सुरू आहेत. प्रत्येकाला एक लॅपटॉप, टॅब किंवा मोबाईल हवा असतो. त्याचबरोबर आपल्या कामामुळे किंवा लेक्चरमुळे इतर कोणी डिस्टर्ब होऊ नये म्हणून हेडफोन किंवा इअरफोन लावून बसावं लागतं.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजखरं तर अधिक काळ कानाला हेडफोन किंवा इअरफोन लावून बसल्याने बहिरेपणा येण्याची शक्यता असते. पण सध्याच्या काळात तरी ही गरज बनली आहे. पण कानांवर कमी परिणाम व्हावा म्हणून इअरफोनपेक्षा हेडफोनचा वापर करावा आणि त्याच्या आवाजाची पातळी कमी ठेवावी....
Gerenal

तारुण्य पीटिका का येतात.?

'तारूण्य पीटिका' या नावावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचा तारुण्याशी संबंध आहे. १४-१५ वर्षांच्या मुला मुलींना तारुण्यपीटिका येतात. काही जणांना त्या कायम होतच राहतात. तारुण्यपीटिका म्हणजेच त्वचेवर येणारे फोड. ते चेहर्‍यावर वा शरीरावर इतरत्र कुठेही येऊ शकतात. त्वचेत काही तैलग्रंथी असतात. त्यातील स्त्रावामुळे त्वचा स्निग्ध राहते. त्यांची रंध्रे बंद झाल्यास त्यातील स्त्राव गोळा होतो व फोड येतात. नंतर जंतुसंसर्गही होतो. या फोडांना तारुण्यपीटिका असे म्हणतात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजतारूण्य पीटिका येण्याची अनेक कारणे आहेत. पौगंडावस्थेमध्ये शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) प्रमाणात होणारे बदल, त्वचेची नीट निगा न राखणे, दीर्घ मुदतीचे आजार, कुपोषण, आहारात मेदयुक्त पदार्थांचा जास्त समावेश, बद्धकोष्ठ, तसेच मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे तारूण्य पटीका होतात. साहजिकच तारुण्यपीटिका उप...