Saturday, March 21

Blog

Article

प्रेम म्हणजे जीवन बरबाद करणं नव्हे.!

  युवक-युवतींचे प्रेम हे केवळ शारीरिक आकर्षण असते. प्रेम करण्यासाठी पोक्तपणा यावा लागतो.तो केवळ स्वाध्यायाने प्राप्त होतो.खलनायक व हिरो दोघेही मुलींना छेडण्याचेच काम करतात. दोहोंमध्ये मला भेद दिसत नाही. मुली शक्यतो लफंग्यांवर प्रेम करतात कारण तेच त्यांच्या मागे लागून त्यांना छेडत असतात. सरळमार्गी मुले ही कधी मुलींच्या पसंतीस पडत नसतात. मुलींना व्हिलनच आवडतात.   अलिकडे प्रेम वाढलं आहे. पण हे वाढलेले प्रेम हे स्वार्थासाठी असून ते प्रेम हे काही खरं प्रेम नाही. परंतू आपल्याला ते माहित नसल्यानं आपण त्याच प्रेमाच्या पाठीमागं धावत असतो. आपल्याला हे माहित नसतं की हे प्रेम कोणत्या थराला नेवून सोडेल.प्रेमाच्या परीभाषेत महाविद्यालय जीवनाचा विचार केल्यास एक तरुण एका आपल्याच महाविद्यालयातील करुणा प्रेम करतो. तिही त्या तरुणावर विश्वास ठेवून त्या तरुणाच्या जाळ्यात पडते आणि हे तिला जाळ्यात ओढून घेत असतांन...
Gerenal

रागावर मिळवा नियंत्रण

रोजच्या आयुष्यात राग येणं अगदी स्वाभाविक आहे. पण रागावर नियंत्रण मिळवणंही तितकंच गरजेचं आहे. रागाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर नातेसंबंधांवरही होतो. त्यामुळे रागाचं व्यवस्थापन करण्याच्या या टिप्स तुमच्या कामी येतील.   तुम्हाला एका विशिष्ट परिस्थितीत राग येतो किंवा काही गोष्टी मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर चिडचिड होते. मात्र उगाचच रागविण्यापेक्षा किंवा चिडचिड करत बसण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधणं गरजेचं आहे. समस्या कितीही जटील असली तरी सुटू शकते. त्यामुळे समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.रागाच्या भरात आपण बरंच काही बोलून जातो. या शब्दांमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि नात्यांवर परिणाम होतो. त्यामुळे राग आल्यावर फार बोलू नका. शांत व्हा. राग कमी झाल्यावर स्वत:च्या भावनांना वाट करून द्या. शांतपणे चर्चा करा. आपली समस्या, प्रश्न किंवा व्यथा शांतपणो मांडा.   राग येण्यामागच्या कारणांचा श...
Gerenal

किफायतशीर दरांमुळे घरखरेदी आली आवाक्यात

कोरोना विषाणूची कमी होत जाणारी तीव्रता आणि अर्थव्यवस्थेची रूळावर येणारी गाडी यामुळे ग्राहकांनी घरखरेदीच्या योजना पुढे ढकलू नयेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं असून सध्याचा काळ मालमत्ता खरेदीसाठी अगदी योग्य असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.   बांधकाम व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या योजना आणि विविध राज्यांच्या सरकारांनी दिलेल्या सवलती यामुळे गेल्या वर्षीचा सणासुदीचा काळ घरखरेदीसाठी उत्तम मानला जात होता. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे खरेदीदारांनी आपल्या योजना पुढे ढकलल्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनाचं सावट चांगलंच कमी होत आहे. अर्थव्यवस्थेलाही गती मिळू लागली आहे. त्यामुळे आता घरखरेदी लांबणीवर टाकण्यात काहीच अर्थ नसल्याचं मालमत्ता क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत. अनेक कारणांमुळे सध्याच्या काळात घरखरेदीचा निर्णय योग्य ठरू शकतो.   किफायतशीर दरात उपलब्ध असणारी घरं हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणत...
Gerenal

मद्यपान करताय?

मद्यपान करणं हा आजकाल ट्रेंड बनत आहे. पण कधीतरी केलेलं मद्यपान सवय कधी बनते हे समजतही नाही. मद्यपान सोडल्यानंतर कोणते सकारात्मक बदल होतात याविषयी जाणून घेतलं तर ही घातक सवय सोडणं सोपं जाईल.सततच्या मद्यपानामुळे शरीरात पाणी आणि अतिरिक्त फॅट्स जमा होतात. दारू सोडल्यानंतर साधारण दोन आठवड्यात फॅट्सचं प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होऊ शकतं. मद्यपानामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. मद्य सोडल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. मद्यपानामुळे शरीरात विषारी द्रव्यं जमा होतात. पणं सोडल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये याचं प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत कमी होतं. झोप न येणं, ताणतणाव अशा समस्या मद्यपानामुळे निर्माण होतात. दारू सोडल्यानंतर या समस्या सुटू शकतात.दारूमुळे तोंड, यकृत आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. दारू सोडल्यास ही शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. मद्...
Article

समाजभान जपणारी कविता : वेस

ठाण्याचे कवी सुधीर शेरे यांचा 'वेस' हा पहिलाच काव्यसंग्रह. काव्यसंग्रह पहिला जरी असला तरी त्यातील कविता अनुभवताना पहिलेपणाच्या खुणा कुठेच जाणवत नाहीत, हे विशेष! या काव्यसंग्रहात एकंदर ३९ कविता आहेत. या सर्वच कविता त्यांच्या जीवनाबद्दलच्या वैचारिक आणि भावनिक जाणिवांतून आकाराला आल्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या परिसरात कवीचा जन्म झाल्याने आणि नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाल्याने या दोन्ही ठिकाणचे जीवनानुभव त्यांच्या कवितेतून चित्रित होतात. शिक्षक म्हणून जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांच्या संवेदनशील मनाला जे जाणवले त्या संवेदनांना काव्यमय रुप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अर्थात, त्यांचा हा प्रयत्न निश्चितच काव्यप्रांताची वेस ओलांडणारा आहे. यमक आणि मुक्तछंद या काव्यप्रकारात आविष्कृत झालेली, समतेचे गीत गाणारी ,मानुसकीचे मूल्य जपणारी, देशप्रेमाने ओथंबलेली आणि मराठी भाषेचा अभिम...
Article

राजकारणातील चाणक्य: मा. शरद पवार

आले किती गेले किती संपले नि परतले भरारा तुमच्या नामाचा शरदराव राजकारणात भारी दराराराजकारणातील धोरणी आणि चाणक्य मानले गेलेल्या मा. शरद पवार साहेबांचा जन्म १२ डिसेंबर १९४० सालचा. पुर्ण नसानसांत राजकारण ठासून भरलेला असा हा नेता आजही नेटाने राजकारणात पाय रोवून उभा आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची आदर्श व्यक्तिमत्व आहेत. सुरुवातीला ते नीरा कॅनाल सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी होते. नंतर बँकेचे व्यवस्थापक झाले .सुशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले शरदराव पवार १९५६ साली शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झाले आणि त्यांच्या राजकीय जीवनाला इथूनच सुरुवात झाली. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले गेले. चव्हाण यांच्या भाषणामुळे ते अ...
Gerenal

छंदांना व्यवसायाची जोड..!

अनेक महिलांमध्ये उपजत कला-गुण आढळतात. अनेक महिलांना चित्रकला, हस्तकला, मूर्तीकला आवडते. डिझायनिंग, अँनिमेशन, गेमिंगमध्येही त्यांना रस असतो. पण या छंदांना, कलागुणांना विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून वाव देता येतो. हे अभ्यासक्रम पूर्ण करून छंद, आवडींना व्यवसायाची जोड देऊ शकता.   चित्रकला, हस्तकला, डिझायनिंगसारख्या कलांना फाईन आर्टस म्हटलं जातं. यात बॅचलर, मास्टर्स किंवा पीएचडी करता येते. सोबत वर्षभराचे डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बॅचलर इन फाईन आर्टस साठी चार वषर्ं द्यावी लागतात. दोन वर्षाचा मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फाईन आर्टसमध्ये पीएचडी करता येते. दूरस्थ शिक्षण पद्धतीनेही फाईन आर्टची पदवी मिळवता येते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक संधी प्राप्त होतात. इतर क्षेत्रांमध्ये नोकरी करणार्‍या महिला फ्री लान्सर म्हणून काम करू शकतात.     आपल्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवू शकतात. जा...
Gerenal

हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी

ऋतू बदलला की त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलावी. थंडीत त्वचा कोरडी पडते, रॅश येतात. त्यामुळे काही उपाययोजना कराव्या.थंडीत त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. या टॅनिंगपासून वाचण्यासाठी त्वचेला योग्य एसपीएफ असणारं सनस्क्रिन लावावं. दिवसा घराबाहेर पडण्याआधी २0 मिनिटे सनस्क्रिन चेहर्‍यावर लावा. त्वचेचा ओलावा कायम राखणारं मॉश्‍चरायझिंग फेसवॉश वापरणं इज मस्ट. बाजारात अनेक मॉश्‍चरायझिंग फेस वॉश आहेत. या फेसवॉशमुळे चेहरा धुतल्यानंतरही कोरडा पडत नाही. चेहरा मऊ रहायला मदत होते. हा फेसवॉश तुमच्या त्वचेला पोषण देतो.तुम्ही दिवसा घराबाहेर पडणार नसाल तर चेहर्‍याला हलकं मॉश्‍चरायझर लावा. यामुळे त्वचेतला ओलावा कायम राहील. मॉश्‍चरायझर हलकं नसेल तर तुमची त्वचा तेलकट दिसेल याची दखल घ्या. दिवसा कोरफड किंवा गुलाबमिश्रीत मॉश्‍चरायझरचा वापरही योग्य ठरेल. या काळात ओठ कोरडे पडतात. त्यामुळे आपल्या जवळ कायम लिपबाम ...
Gerenal

फिट आल्यानंतर काय करावे?

एपिलेप्सी हा एक मेंदूसंदर्भातील आजार आहे. फिट येणे, आकडी, मिरगी आदी नावांनी एपिलेप्सी हा आजार ओळखला जातो. फिट्स येणे ही एकप्रकारे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये असामान्य तरंग निर्माण होऊ लागतात. यात रुग्णाला झटके येतात, तो जमिनीवर पडतो आणि काही वेळासाठी तो बेशुद्ध होतो. सुमारे १0 व्यक्तींपैकी एकाला फिट्स येण्याचा त्रास असतो. फिट्स येण्याची समस्या अनुवांशिकही असू शकते, याशिवाय मेंदूचा संसर्ग, डोकेदुखी, स्ट्रोक आणि ब्रेन ट्यूमरही याला कारणीभूत आहे. विशेषत: मेंदूतील रासायनिक आणि विद्यूत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. मेंदूमध्ये छोट्या पेशीमध्ये इलेक्ट्रीक प्रक्रिया होत असतात. यातील काही पेशी दुसर्‍या पेशींना उत्तेजित करतात. अशा स्थितीत इनहिबिटर पेशी रोखल्या जातात. या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्याने संतुलन बिघडते आणि फिट्स येण्याचा...
Gerenal

मासिक पाळीतील अनियमितता

महिलांसाठी मासिक पाळी नियमित ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जर हे नियमित नसेल तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. तसे मासिक पाळी २-४ दिवस मागेपुढे होणे सामान्य आहे. काही स्त्रियांमध्ये पाळीचा काळ निश्‍चित नसतो. जर त्यांची मासिक पाळी एका विशिष्ट वेळेत न येता खूप कालांतराने येत असेल तर या मागे अनेक कारणे असू शकतात.अनियमित दिनक्रम आणि चुकीचा आहार : मासिक पाळीचे चक्र बदलण्याचे सर्वात मोठे कारण अनियमित जीवनशैली आहे. सुस्त जीवनशैलीमुळे शरीराच्या संप्रेरकांवर देखील परिणाम होतो. अनियमित दिनक्रमांमध्ये व्यायाम न करणे, वेळेवर झोप न घेणे, वेळेवर न खाणे इत्यादींचा समावेश आहे.उच्च तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे देखील मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त म्हातारपणाचा किंवा तरुणपणाचा परिणामही मासिक पाळीवर दिसून येतो. ज्या स्त्रियांचे वय ४0 पेक्षा जास्त आहे त्यांना रजोनवृत्ती पूर्वी मासिक पाळीमध्य...