Saturday, March 21

Blog

Article

शोध सुखाचा

उत्कर्ष विद्या मंदिरचे पटांगण पालकांनी व विद्यार्थ्यांनी गच्च भरलेले होते. त्याला कारणही तसेच होते. शाळेच्या वर्धापन दिनाचा सुर्वण महोत्सव होता. ह्या सोहळ्याला पंधरा वर्षांपुर्वी शाळेतून बोर्डाच्या परिक्षेत पहिली आलेली, तसेच शाळेतले अत्यंत आवडते शिक्षक देशपांडे सरांची मुलगी, आज एक प्रख्यात सर्जन होऊन प्रमुख पाहुणी म्हणून येणार होती.शाळेचे मुख्याध्यापक, सारा शिक्षक वर्ग तसेच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाची कारंजी उसळत होती. रंगीबेरंगी पताका, फुलांच्या माळा, डोळे दिपवून टाकणारी प्रमुख पाहुणीच्या चित्राची सुशोभित रांगोळी तसेच सनईच्या मंजुळ स्वरांनी शालेय परिसर लग्न घरासारखाच वाटत होता.   नियमित शाळेत वेळेवर येणारी विद्यार्थिनी आज पाहूणी म्हणून आली ती सुध्दा वेळेच्या अगोदरच. त्यामुळे शिक्षकांसकट सर्वच चकित झाले. आगत स्वागत झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रथम यशश्री ...
Gerenal

हृदयविकाराबाबत जाणून घ्या

हल्ली हृदयविकाराचं प्रमाणही वाढू लागलं आहे. त्यादृष्टीने काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आपल्या हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांची अहोरात्र गरज असते. या पेशींमध्ये रक्तप्रवाह सुरू ठेवण्याचं काम तीन धमन्या करतात. यापैक दोन धमन्या हृदयाच्या डाव्या बाजूला असतात. त्यातील प्रमुख धमनी पुढच्या भागात असते. हृदयविकाराच्या एकूण झटक्यांपैकी ६0 ते ७0 टक्के झटके हे पुढच्या धमनीतल्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने येतात.    बैठी जीवनशैली, तेलकट, गोड पदार्थांचं सेवन, व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. हे कोलेस्टेरॉल धमन्यांच्या भिंतींमध्ये साठू लागतं. यामुळे धमन्यांच्या भिंतींची लवचिकता निघून जाते. या भिंतींवर प्लेटलेट्स साठायला सुरूवात होते. त्यामुळे धमन्यांच्या छिद्रांचा आकार लहान होत जातो आणि अखेर ही छिद्रं बंद होतात. रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने रक्तप...
Gerenal

थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी..!

अनेकांना हायपोथायरॉईडझमचा त्रास असतो. भारतात दहा पैकी एका व्यक्तीला या विकाराने ग्रासले आहे. निरोगी जगण्यासाठी थायरॉईड नियंत्रणात असणे गरजेचे असते. हार्मोन्सचे असंतुलन हे थायरॉईडचे मूळ कारण आहे. आहारातल्या काही बदलांमुळे थायरॉईड नियंत्रणात ठेवता येतो.अँव्होकॅडो हे विविध पोषक घटकांनी समृद्ध फळ आहे. यात पोटॅशियम तसेच इतर काही पोषक घटक असतात. यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात रहायला मदत होते. तसेच हार्मोन्सचे संतुलन साधले जाते. यामुळे थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत सुरू रहायला मदत होते.हिरव्या पालेभाज्यांमधल्या पोषक घटकांमुळेही हार्मोन्सचे संतुलन साधले जाते. त्यामुळे आहारात अशा भाज्यांचा समावेश करायला हवा. विविध प्रकारच्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अँसिड्स असतात. या पोषक घटकामुळे शरीराचा दाह कमी होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढते तसेच हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी होतो. थायरॉईड ग्रंथीं...
Article

नाताळ सांताक्लॉजसंगे

जिंगल बेल्स जिंगल बेल्स जिंगल ऑल द वे सांताक्लॉज इज कमिंग रायडिंग डाऊन धिस वेबालपणी शाळेतील इंग्रजीच्या तासाला म्हटलेल्या या कवितेची नाताळ दिवशी हमखास आठवण येते. नाताळ किंवा क्रिसमस हा ख्रिस्ती बांधवांचा सण. तो २५ डिसेंबरला जगभर साजरा केला जातो. कारण याच दिवशी ख्रिस्ती लोकांचे प्रभू येशूचा जन्म झाला होता. काही ठिकाणी हा सण ६ किंवा ७ जानेवारीला एपिफानी म्हणून साजरा करतात.नाताळ हा सण १२ दिवसांचा असतो. जगभरात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. काही ठिकाणी मध्यरात्री साजरा करतात. नाताळ हा शब्द मूळचा लॅटिन. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असे मानले जाते. प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. 'बेथलहेम' हे इस्त्राईल देशातील छोटेसे गाव आहे. याच गावात येशूचा जन्म झाला. त्या दिवशी इथून लोकं रात्रीच मिरवणूक काढतात अन पहाटेला जेरुसलेमला पोहोचतात.नाताळ सणांमध्ये भेटवस्तू द...
करजगावचे  संघर्षशील  व्यक्तिमत्व : सतीश दवणे
Article

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे "अच्छे ने अच्छा, और बुरे ने बुरा जाना मुझे, क्योंकी जिसकी जितनी जरुरत थी, उसने उतनाही पहचाना मुझे"ओल्या रांजणाचा काठ कुंभार जितक्या सहजतेने वळवू शकतो, मातीच्या ओल्या गोळ्याला जसा आकार देवू शकतो तेवढ्याच सहजतेने परिस्थितीवर स्वामित्व ठेवून तो ती बदलू शकतो, हवी तशी अनकुल करुन घेऊ शकतो हे सर्व तो त्यांच्या सुप्त व प्रकट सामर्थ्यांच्या, चारित्र्य संपन्नतेच्या, विचाराच्या, सत्कर्माच्या आणि पुरूषार्थाच्या जोरावर साध्य करतो. त्याच्या मनात असणाऱ्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या साध्यास साध्य, सिद्ध करू शकतो. गरींबी, अवहेलना व अपमान, अवतीभवतीची स्थिती, घरच्या पिंजलेल्या भूकेभोवती पिंगा घातलेल्या यातना यातून मनात जिद्द, इच्छाशक्ती पेटून ऊठते व जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी कष्टाची तयारी मनात ठेवून जो वाटचाल करतो तो आपल्या ध्येयसिध्दीपर्यंत पोहचतो ह...
Article

ख्रिश्चन धर्म;प्रेमाचं प्रतिक

२५ डिसेंबर सर्व ख्रिश्चन बांधव हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा करतात.ज्याप्रमाणे हिंदू बांधव दिवाळीला आपले घर सजवतात.मुस्लिम बांधव ईदला घर सजवतात.बौद्ध मंडळी १४ एप्रिलला घर सजवतात.तसेच ख्रिश्चन बांधवही या दिवशी घर सजवतात. या दिवसासाठी अगदी घराला रंग देण्यापासून तर फटाके फोडण्यापर्यंत लोकं मजल मारतात.हा दिवस हा येशूचा मृत्यू दिवस जरी असला तरी ते मृत्यूलाच पवित्र मानून हा दिवस साजरा करतात.तर जाणून घेवूया प्रभू येशूंविषयी.........*प्रभू येशू कोण होते? प्रभू येशूबाबत सांगायचं झाल्यास प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे असं ते मानतात आणि इश्वराबाबत सांगायचं झाल्यास त्यांचा ईश्वर हा कधीच जन्म घेत नसून तो पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी आपल्या पुत्रांना पाठवतो असे ते मानतात.प्रभू येशूला देव मानण्याचे कारणही ते सांगतात की प्रत्यक्ष परमेश्वर जरी या पृथ्वी वर जन्म घेत नसला तरी प्रभू येशू हा देवाचा पुत्र...
Article

प्रा. सुरेश पुरी यांचे अनोखे समाजकार्य

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे निव्रुत्त प्रा. सुरेश पुरी यांचे नाव मराठवाडा प्रांतात सर्वदूर परिचित आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, भटक्या विमुक्तांची चळवळ, प्राध्यापकांची मुटा चळवळ आणि सरांनी गोरगरीब विद्यार्थी वर्गासाठी केलेले प्रचंड कार्य यामुळे सरांचे नाव घराघरात पोहोचले आहे. समाजकार्याचा नवा आदर्श त्यांनी उभा केलेला आहे. जाणून घेऊया त्यांच्या या कामाविषयी ..   आयुष्य छोटे आहे आणि आपण पृथ्वी नावाच्या उपग्रहावरील पाहुणे आहोत. जे आज आपले आहे ते काल आपले नव्हते. आपल्या अस्तित्वाने आपण जग सुंदर करणार आहोत की या जगाला खराब करणार आहोत याचा ज्याचा त्याने नक्की विचार करावा. जगात स्वर्ग नाही. मृत्यु नाही आणि पुनर्जन्मही नाही. जे आहे ते आज आहे. आता तर या कोरोना काळात आपण सर्वजण अक्षरश: मृत्यूच्या दाढेत आहोत. असं असलं तरी माणसाची हाव आ...
Gerenal

थंडीतही सुरू ठेवा व्यायाम.!

हुडहुडी भरवणार्‍या थंडीत सकाळी उठून व्यायाम करणं जीवावर येतं. अंगावरचं पांघरून बाजूला करावंसं वाटत नाही. पण तासभर झोपण्यासाठी आपण आपल्या आरोग्याकडे, फिटनेसकडे दुर्लक्ष करतो. एखाद्या दिवशी झोपणं ठीक आहे. पण दररोजचा आळस उपयोगाचा नाही. थंडीच्या दिवसातही स्वत:ला व्यायामासाठी कसं सज्ज करता येईल याबाबतच्या काही टिप्स.   थंडीत घराबाहेर पडायचं नसेल तर घरीच व्यायाम करा. योगा, जॉगिंग, डान्स असं काहीही करता येईल. घरच्या घरी करण्यासारखे साधेसोपे व्यायामप्रकार आहेत. हे व्यायाम करून तुम्ही फिट राहू शकता. ? दररोज एकाच प्रकारचा व्यायाम करून कंटाळा येतो. मग व्यायाम टाळला जातो. व्यायाम एकसुरी होत असेल तर डान्स, जीम, योगा, धावणं असं वैविध्य आणण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला दररोज व्यायाम करावासा वाटेल. व्यायाम करण्यामागची कारणं टिपून ठेवा. काही जण वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेससाठी व्यायाम करतात. आपल्या...
Article

उर्मिला गझल संग्रह परिचय

गझल मंथन समुहाच्या सतत गझल कार्यशाळा घेणाऱ्या, ज्या सध्या त्यांच्या १९ व्या कार्यशाळेत गझलकार व गझलकारा तयार करत आहेत, त्या आदरणीय गुरूवर्या, आमच्या आ. माई, म्हणजेच उर्मिला बांदिवडेकर ह्या होय. त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला गझल संगह उर्मिला गझल संग्रहाविषयी लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे.'उर्मिला' हा आ.माईंचा पहिला वहिला गझल संग्रह. उर्मिला नावाप्रमाणेच त्यांचा त्याग, निःस्वार्थी साहित्याची सेवा, तसेच ह्या वयात ही तरुणाईला लाजवेल असा गझल शिकवण्याचा गोडवा व उत्साह बघून तोंडात बोटे घालावी लागतात. "गझलकार/गझलकारा घडवणे हा त्यांचा गुण, आणि 'गझल मंथन' हा एक मोठा परिवार. "गझल मंथन हा वृक्षच मुळात माईंच्या रुपानं अनेकांचा आधारवड ठरलाय", असे त्यांच्याच कार्यशाळेत घडलेले गझलकार विष्णू जोंधळेसर म्हणतात, ते अगदी खरेच आहे.माईच्या उर्मिला गझल संग्रहात एकूण एकशे एक गझला विविध रंग, ढंग, कला कौशल...
Article

नवसमाज निर्मितीसाठी : अलर्ट

नव्वदोत्तरीतील एक व्यासंगी,अभ्यासू चिकित्सक आणि उत्कृष्ट लेखक,समीक्षक म्हणून साहित्यक्षेत्रात ज्यांचा गौरवाने नामोल्लेख केला जातो असे कविवर्य प्रशांत नामदेवराव ढोले (देवळी) यांचा "अलर्ट" हा काव्यसंग्रह नुकताच प्राप्त झाला आणि अवलोकन केला.त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह असून सुधीर प्रकाशन वर्धा द्वारे प्रकाशित करण्यात आला.तत्पूर्वी सखोल अवलोकन आणि सूक्ष्म निरीक्षणातून "आंबेडकरी जाणीवाचा अक्षरप्रकाश" हा समीक्षाग्रंथ वाचकांच्या सेवेत दाखल झाला आहे.एक शिक्षक म्हणून सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याची जबाबदारी पेलताना समाजमनही तितक्याच आत्मीयतेने अभ्यासले.कुठलाही आव न आणता किंवा कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात अकारण उभे न करता जे दृष्टीस पडले,अनुभवले तेच त्यांनी "अलर्ट" मध्ये मांडले. वर्तमानातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कायम असलेली आर्थिक-सामाजिक विषमतेची चौकट मोडीत काढण्यासाठी समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्...