फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव..!
*चालोरे डायसाणें होळीर...खेला!
================================
भारत वर्षात होळी हा सण प्रामुख्याने सर्व जाती-जमातीची लोक साजरा करतात. परंतु बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. मुळातच नाच-गाण्यात मदमस्त जीवन जगणारी ही गोरबंजारा जमात होळी सणात आपली पूर्ण हाऊस भागून घेते. गोरबंजारा गणात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी म्हातारे-कोतारे माणसाला होळी तारुण्य देते. उनाड तरणीबांड पोराना ती चावटपणा देते. मोहाच्या फुलाची (पेलेधारे) फुल दारू पिऊन पक्षपात, वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे विसरून होळी खेळावी ती गोरबंजारा समाजांनीच. फाल्गुन महिना लागला रे लागला की डपाच्या आवाजांनी होळी हळू हळू तांडया कडे येते. शेतामध्ये राब राब राबून थकून गेलेले लोक रोज रात्रीला गोलाकार बसल्याजागी बैठे लेंगी गीत गातात.
डफ धीरो वजारे तारी जाणीं ढळजा, डफ धीरो...वजार ..
डफड...