बिजवाई
कालं सपनात आली
रात्री माही काळी आई
मातीत पेरावी म्हणे
अस्सलच बिजवाई !!
दया, क्षमा, शांती, त्याग
धर्म निवड बियाचा
जात नको पाहू त्याची
गुन पाह्य रे वाणाचा !!
घेई टपोरा निकोप
दाना दाना निवडून
देई एकाचे हजार
स्वतः मातीत गाडून !!
बीज असावे ईमानी
मातेशी अन मातीशी
असू नयेच गद्दार
दूध, पाण्याच्या थेंबाशी !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556.