Sunday, October 26

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिका

Banjara.jpg OK

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिका

Banjara 1.jpg ok
  बंजारा समाजाचे मूळ खूप प्राचीन काळात आहे.काही संशोधकांच्या मतानुसार बंजारा लोक मूळ राजस्थानातून स्थलांतरित झाले.बंजारा समाज "लदेणीकार" म्हणून ओळखला जात होता.त्यांनी मीठ,धान्य,धातू,वस्त्रे इत्यादी वस्तू गावोगावी,राज्यात परराज्यात पोहोचवल्या.भारतातील अनेक राजाच्या युद्धकाळात बंजारा समाजाने सैन्याला रसद पुरवली.कालांतराने ब्रिटिश काळात रेल्वे आल्यामुळे गोरमाटी समाजाचे पारंपरिक व्यवसाय बंद पडले.त्यामुळे समाज आर्थिकदृष्ट्या खालावला.कमकुवत बणत गेला.इंग्रजानी बंजारा समाजावर "गुन्हेगारी जमात" अशी शिक्कामोर्तब करणारे कायदे केले.त्यामुळे समाज आणखी मागे पडल.स्वातंत्र्यानंतरही स्थिरता,शिक्षण,शासनाच्या योजना यापर्यंत समाज पूर्णपणे पोहोचू शकला नाही.स्वातंत्र्याची फळे यांना चाखता आली नाही. 

म्हणूनच बंजारा समाज आजही वंचित आहे.म्हणून एसटी प्रवर्गात समावेश करणे आवश्यक आहे.यामुळे समाजाच सर्वांगीण विकास होणार आहे. आपण पहातोय भारतीय समाजव्यवस्थेत जाती,जमाती आणि भटकंती करणाऱ्या समाजांचे स्थान गुंतागुंतीचे राहिले आहे.भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना समान हक्क दिले असले तरी अनेक समाज आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक दृष्टीने मागे राहिलेले आहेत.यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,इतर मागासवर्गीय अशा प्रवर्गांची रचना करण्यात आलेली आहे.

भारतातील आदिम समाजापैकी बंजारा समाज हा प्राचीन,ऐतिहासिक आहे.तरी हा समाज प्रगतीपासून अद्याप वंचित राहिलेला समाज आहे.हा समाज परंपरेने भटकंती करणारा असल्याने शिक्षण,स्थिर रोजगार,सामाजिक प्रतिष्ठा यापासून वंचित राहिलेला आहे. भारतातील अनेक राज्यांत बंजारा समाज वेगवेगळ्या प्रवर्गांत समाविष्ट आहे.वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.हा समाज काही ठिकाणी ओबीसी,काही ठिकाणी डीटी/एनटी तर आपल्या शेजारी राज्य तेलंगणात आधीपासून एसटी समाजात आहे. आपल्या महाराष्ट्रासह काही राज्यांत बंजारा समाजाला अजूनही एसटी दर्जा मिळालेला नाही.आता सुरु झालेला हा लढा केवळ कागदोपत्री राहणार नाही,तर समाजाच्या अस्तित्वाशी आणि भविष्यासोबत निगडित राहणार आहे.समाजाचे भविष्य घडविणारा हा लढा असणार आहे .

आपला देश हा विविधतेत एकता असलेला देश आहे.येथे प्रत्येक जाती,जमाती,भाषा,धर्म यांना संविधानाने समान हक्क दिले आहेत.तरीसुद्धा काही समाज आर्थिक,शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागे पडले.बंजारा समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या स्थलांतरित,भटकंती करणारा आणि वंचित घटक मानला जातो.बंजारा समाज अनेक दशकांपासून एस.टी. प्रवर्गाचा दर्जा मिळवण्यासाठी झगडत आहे.यासाठी आज हा समाज सनदशीर मार्गाने लढाई लढत आहे.

 या लढ्यात तरुणाई ही खरी ताकद आहे.कारण तरुणाईकडे ऊर्जा,जिद्द,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,शिक्षणाची भूक आणि बदल घडवून आणण्याची क्षमता असते.या लढ्यासाठी जर बंजारा समाजाचा तरुण जर योग्य दिशेने, संघटित पद्धतीने काम केले,तर एस.टी. प्रवर्गातील बंचाजाराच्या समावेशाचे स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकेल.

यासाठी बंजारा समाजातील तरुणांची भूमिका काय असावयास पाहिजे ?यासाठी त्यांनी काय केले पाहिजे ? शिक्षण हा कोणत्याही समाजाचा प्रगतीचा पाया आहे.समाजातील तरुणांनी सर्वप्रथम शिक्षणाला शस्त्र मानले पाहिजे.डॉ.बाबासाहेब च्या भाषेत सांगावयाचे झाल्यास शिक्षण वाघीणीचे दूध आहे.समाजातील तरुणांनी शासनाच्या योजनांचा योग्य वापर करून जास्तीत जास्त शिक्षण घेणे गरजेचे आहे.उच्च शिक्षण घेऊन वकील,प्राध्यापक,प्रशासक,पत्रकार, अभियांत्रिकी,वैद्यकीय,प्रशासन,पत्रकारिता, विधी,समाजशास्त्रज्ञ अशा अनेक क्षेत्रांत प्रवेश करणे आवश्यक आहे.जेणेकरून समाजाच्या प्रश्नांना शास्त्रीय व कायदेशीर आधार मिळेल.तरुणांनी समाजातील लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी स्वीकारावी.वाईट सवयीपासून दूर राहून छोटया मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजे.गावोगावी मोफत शिक्षण वर्ग,शिबिर आयोजन केले पाहिजे.तरुणांनी शिक्षणाला सर्वांत जादा महत्त्व द्यावे.शासनाच्या वसतिगृहे,शिष्यवृत्ती,मोफत शिक्षण योजना यांचा वापर करून जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे.शिक्षण घेतलेले तरुण समाजातील इतर मुलांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे.

समाजातील तरुणांनी समाजातील वयस्क, अनुभवी व्यक्तीना भेटून बंजारा समाजाचा इतिहास फार प्राचीन आहे,परंतु योग्य नोंदींचा अभाव आहे.तरुणांनी संशोधन करून,जुने ग्रंथ, गाणी, वाड्मय, लोककला,परंपरा यांचे दस्तऐवजीकरण करावे.याचा फायदा समाजाला होईल.एस.टी.प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी ऐतिहासिक व समाजशास्त्रीय पुरावे गरजेचे आहेत.ते पुरावे गोळा करणे ही तरुणांची जबाबदारी आहे.एस.टी.प्रवर्गात समावेशासाठी पुरावे महत्त्वाचे असतात.तरुणांनी लोककथा, दंतकथा, गाणी,संस्कृती,जुने दाखले,सरकारी अहवाल यांचे संकलन करावे.ग्रंथालये,संग्रहालये,विद्यापीठांशी संपर्क करून संशोधन करावे.समाजाची खरी ओळख बाहेर आणणे ही तरुणांची जबाबदारी आहे.हे युग तंत्रज्ञानाचे आहे.कृत्रिम बुध्दीमतचे आहे.तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर हाआधुनिक हत्यार म्हणून वापर केले पाहिजे.सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करता येते.युट्युब,फेसबुक,ट्विटर, इंस्टाग्रामवर माहितीपट,व्हिडिओ,पोस्टर तयार करून पसरवावेत.तरुणांनी शासनाला ऑनलाईन अर्ज,मेल मोहिमा,ट्विटर ट्रेंड यांच्याव्दारे दबाव आणता येईल.तरुणाला मोबाईल अप्स किंवा वेबसाइटद्वारे समाजाच्या प्रश्नांची नोंद ठेवता येईल.

तरुणानो आजच्या काळात सोशल मीडियाची ताकद अफाट आहे.तरुणांनी फेसबुक, ट्विटर, युट्युब, इंस्टाग्राम यांचा वापर करून जनजागृती अभियान राबवावे.समाजातील खऱ्या समस्या, इतिहास, मागासलेपणा, अन्यायकारक धोरणे यावर माहितीपट तयार करून पसरवावी.ऑनलाईन पिटीशन,ई-मेल मोहिमा, डिजिटल कॅम्पेनद्वारे शासनावर दबाव टाकता येते.

तरुण वेगवेगळ्या संघटनेत न राहता या संघर्षासाठी एकत्र येवून संघटनात्मक बांधणी करावी. तांडा, तालुका,जिल्हा,राज्य अशा प्रत्येक पातळीवर युवा संघटना तयार कराव्यात.या संघटनांच्या माध्यमातून शांततामय मोर्चे, आंदोलने,उपोषणे यांचे नियोजन करता येते.संघटनांमुळे समाजाचे एकत्रित अस्तित्व सिद्ध होते.तरुणांनी संघटित राहणे अत्यंत आवश्यक आहे.संघटनेमुळे समाजाची ताकद एकवटून आपले प्रश्न आपल्या समस्या सरकारसमोर मांडता येतात. 

तरुणांनो आंधळ्यासारखं आपणास चालायच नाही.आपणास कायदेशीर मार्गदर्शन घेवून कायदेशीर लढाई लढायची आहे.कायदेशीर योगदान घेवून समाजाला एस.टी.प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी कोर्टात खटले चालवावे लागतील.यासाठी तरुणांनी कायद्याचे ज्ञान घेऊन लॉ फोरम उभारावेत.विधी शाखेत शिकणारे विद्यार्थी समाजाला मोफत कायदेशीर बाबी समजावून सांगावेत.संविधानातील कलमे, आयोगांचे अहवाल, समित्यांचे निर्णय यांचा अभ्यास करून सरकारसमोर मांडणी करण्यासाठी तरुणांनी सखोल अभ्यास करावा. समाजाच्या या मागणीसाठी न्यायालयीन खटले महत्त्वाचे आहेत.शांततामय व लोकशाही मार्ग आणास लढाई लढावयाची आहे.तरुणांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपला लढा हिंसक नसावा. संविधानाने दिलेल्या लोकशाही मार्गांचा म्हणजे निवडणुका,अर्ज,मोर्चे,निवेदन,संसदेत प्रश्न या माध्यमाचां वापर करून आपणास लढा लढावावा लागेल.समाजाचा प्रश्न मांडताना तर्कशुद्धता व संयम गरजेचा आहे.

तरुणांचा भडका कसा उडतो हे आपण पाहिलेले आहे.बांगलादेश,नेपाळ हे देश आपल्या डोळ्यासमोर आहेत.आपल्याला तसे करावा याचे नाही तर शांततामय लढा देवून आपलं काम करून घ्यावे लागेल. तरुणांनी हिंसेचा मार्ग न वापरता लोकशाही मार्ग स्वीकाररून मोर्चे, निवेदने,निवडणुकीत सहभाग, लोकप्रतिनिधींवर दबाव या मार्गांनी लढा लढवूयात.या कामासाठी तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद, पंचायत समिती,या निवडणूका आता लागणार आहेत.यात गोर समाज एक म्हणून गटतट उपजाती असे न करता आपली ताकद दाखवा. येथे निवडणुकीला उभे राहून समाजाचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे.

आपल्या समाजातील लोकसंख्येच्या प्रमाणात सत्ता मिळवणे हा दीर्घकालीन उद्देश समोर ठेवून वाटचाल करू या.प्रत्येक स्तरावर प्रतिनिधी निर्माण झाले पाहिजेत.राजकारणातूनच शासनावर प्रभाव टाकता येतो.सामाजिक ऐक्य प्रस्थापित करुन समाजातील अनेक पोटजाती, गट,प्रादेशिक मतभेद विसरुण,हे मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्र येवू या.तरुणांनो ‘आम्ही आधी बंजारा आहोत,नंतर गट,उपजाती’ ही भावना रुजऊ या.एकतेमुळे समाजाची ताकद वाढते.राष्ट्रीय पातळीवरील सर्व तरुणांशी संपर्क ठेवू या.बंजारा समाज फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आहे पण त्यातल्या त्यात तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक,मध्यप्रदेश,राजस्थान, उत्तरप्रदेश,दिल्ली,गुजरात या राज्यांत मोठ्या प्रमाणात आहे.तरुणांनी राज्यांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणण्याचे काम करने गरजेचे आहे.अखिल भारतीय पातळीवर एक राष्ट्रीय युवा बंजारा संघटना उभारता येईल का ?याचा विचार तरुणांनी करावा.

 आपला एसटी प्रवर्गात समावेश व्हावे यासाठी महिलांचा सहभाग ही अत्यंत महत्वाचा आहे. सुशिक्षित स्त्रिया मुली हे समाज सुदृढ होण्यासाठी चांगले आहे.त्यासाठी समाजातील मुलींना शिक्षण मिळवून द्यावे लारोत. महिला संघटनांना प्रोत्साहन द्यावे.महिलांचा सहभाग वाढला तर समाजाचा आवाज अधिक प्रभावी होतो. समाजाच्या लढ्यात महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे.तरुणांनी समाजातील मुलींना शिक्षण, नेतृत्व आणि रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून प्रयत्न करणे गरजेचे आहे.महिला संघटना तयार करून त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवावा.

बंजारा समाजाचा एस.टी.प्रवर्गात समावेश हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही,तर न्याय,अस्तित्व आणि विकासाचा प्रश्न आहे. हा लढा यशस्वी होण्यासाठी तरुणांचा जोश आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शन हे दोन्ही आवश्यक आहेत.तरुणांकडे जिद्द आणि ऊर्जा असते,तर अनुभवी लोक व नेत्यांकडे मार्गदर्शन आणि शहाणपण असते.या दोन्हींचा संगम झाला, तर कोणताही मोठा लढा आपण जिंकू शकतो. मग एसटी प्रवर्गात बंजारा समाजाचे समावेश व्हावे म्हणुन अनुभवी लोकांची भूमिका काय असली पाहिजे ?त्यांनी तरुणांशी कसे वागावे ? हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे.

समाजातील अनुभवी माणसं,जुन्या पिढीतील व्यक्तीनी तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे.जुन्या पिढीचे अनुभव,चळवळींचा इतिहास,समाजाच्या चढ-उतारांची माहिती तरुणांना उपलब्ध करुन द्या.त्याचबरोबर जुने दाखले,कागदपत्रे,शासकीय पत्रव्यवहार जपून ठेवले असतील तर ते तरुणांना उपलब्ध करुन द्या. अनुभवी लोकांनी सामाजिक एकता निर्माण करू या.समाजातील पोटजातींना एकत्र आणण्याचे प्रयत्न करूया.आपल्यापरिने होईल तेवढी आर्थिक मदत करु या.समाजातील प्रौढानी आंदोलन, संशोधन, कायदेशीर खटले यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.त्याचबरोबर तरुणांना संयम शिकवणे, तरुणाईचा उग्रपणावर योग्य मार्गावर करावे.तरुणांना योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करावे, समाजाचा इतिहास,परंपरा, जुन्या लढ्यांचा अनुभव तरुणांना सांगण्याचे काम करावे.

समाजातील व्यस्काबरोबरच नेत्यांची भूमिकाही या लढ्यासाठी महत्वाची आहे. नेत्याची भूमिका कणखर असावयास पाहिजे. गोरसमाज जंगलात राहतो.तो मानी आहे. स्वाभिमानी आहे.त्यांना माहित आहे फक्त जंगलातील झाडेच त्यांच्यापेक्षा उंच आहेत. म्हणून नेत्यांनी त्यांच्या पक्षांच्या भूमिका मांडण्यापेक्षा,तेथे लाळघोटेपणा करण्यापेक्षा समाजाची भूमिका मांडावी ही सर्व बंजारा समाजाची अपेक्षा आहे.त्यासाठी नेत्यांनी राजकीय दबाव आणावा.शासन दरबारी,संसदेत, विधानसभेत आवाज उठऊन राजकीय दबाव आणावा.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यास पाठबळ द्यावे.जमल्यास आंदोलनाचे नेतृत्व करावे. समाजाच्या मोर्चे,उपोषणे,सत्याग्रह यांना शांततामय यांना दिशा देण्याचे कार्य करावे. समाजाच्या या अतिशय जिव्हाळयाच्या प्रश्नासाठी शासनाशी थेट संवाद साधा.मुख्यमंत्री,मंत्री, पंतप्रधान यांच्याशी चर्चा घडवून आणा.

आपल्या नेतेमंडळीना समाजाच्या वतीने विनंती आहे की त्यांनी राष्ट्रीय पातळीवर समन्वय साधून विविध राज्यांतील नेत्यांना एकत्र आणावे. आजच्या पिढीतील तरुणांना प्रोत्साहन देवून नवीन पिढीला पुढे आणणे आणि नेतृत्वाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.हे काम नेत्यानी करावे अनुभवाच्या अभावामुळे तरुणाईचा जोश कधी कधी चुकीच्या मार्गाला लागू शकतो.त्यामुळे अनुभवी लोकांचे शहाणपण आणि नेत्यांचे नेतृत्व या दोन्ही गोष्टी तरुणाईसोबत आल्यासच समाजाचा एस.टी.प्रवर्गात समावेश होण्याचा लढा यशस्वी होईल. तरुणांनी शिक्षण,तंत्रज्ञान, संघटन,लोकशाही पद्धती यांचा वापर करून संघर्ष करावा.अनुभवी लोक व नेत्यांनी मार्गदर्शन, राजकीय दबाव,दस्तऐवजीकरण आणि एकता साधावी.

तरुणाईची ताकद आणि नेत्यांचे शहाणपण यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच बंजारा समाजाला न्याय मिळू शकतो.'एकतेत ताकद आहे 'हे लक्षात ठेवून सर्वांनी एकत्र काम केले,तर बंजारा समाजाचा एस.टी.प्रवर्गात समावेश लवकरच होईल.तरुणाई म्हणजे समाजाचे भविष्य.जर बंजारा समाजातील तरुण संघटितपणे, शिक्षण,तंत्रज्ञान आणि लोकशाही मार्गांचा वापर करून संघर्ष केले तर एस.टी. प्रवर्गातील समावेशाचा लढा नक्की यशस्वी होईल.“ज्या समाजातील तरुण वेळेवर जागा होतो,तिथे क्रांती घडते” ही गोष्ट ध्यानात ठेवून समाजासाठी प्रत्येक तरुणाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बंजारा समाजाचा एस.टी.प्रवर्गात समावेश होण्यासाठी तरुण,नेते व अनुभवी लोकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.या दोघांचा संगम झाला,तर समाजाला न्याय मिळवणे सोपे होईल.

-राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७ .

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

हे वाचा – पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’-नंगारा म्युझियम


  • नम्र निवेदन
    “निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
    या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
QR


बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण का हवंय?

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.