Tuesday, December 9

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी

ऋतू बदलला की त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलावी. थंडीत त्वचा कोरडी पडते, रॅश येतात. त्यामुळे काही उपाययोजना कराव्या.थंडीत त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. या टॅनिंगपासून वाचण्यासाठी त्वचेला योग्य एसपीएफ असणारं सनस्क्रिन लावावं. दिवसा घराबाहेर पडण्याआधी २0 मिनिटे सनस्क्रिन चेहर्‍यावर लावा. त्वचेचा ओलावा कायम राखणारं मॉश्‍चरायझिंग फेसवॉश वापरणं इज मस्ट. बाजारात अनेक मॉश्‍चरायझिंग फेस वॉश आहेत. या फेसवॉशमुळे चेहरा धुतल्यानंतरही कोरडा पडत नाही. चेहरा मऊ रहायला मदत होते. हा फेसवॉश तुमच्या त्वचेला पोषण देतो.तुम्ही दिवसा घराबाहेर पडणार नसाल तर चेहर्‍याला हलकं मॉश्‍चरायझर लावा. यामुळे त्वचेतला ओलावा कायम राहील. मॉश्‍चरायझर हलकं नसेल तर तुमची त्वचा तेलकट दिसेल याची दखल घ्या. दिवसा कोरफड किंवा गुलाबमिश्रीत मॉश्‍चरायझरचा वापरही योग्य ठरेल. या काळात ओठ कोरडे पडतात. त्यामुळे आपल्या जवळ कायम लिपबाम ...
Gerenal

फिट आल्यानंतर काय करावे?

एपिलेप्सी हा एक मेंदूसंदर्भातील आजार आहे. फिट येणे, आकडी, मिरगी आदी नावांनी एपिलेप्सी हा आजार ओळखला जातो. फिट्स येणे ही एकप्रकारे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये असामान्य तरंग निर्माण होऊ लागतात. यात रुग्णाला झटके येतात, तो जमिनीवर पडतो आणि काही वेळासाठी तो बेशुद्ध होतो. सुमारे १0 व्यक्तींपैकी एकाला फिट्स येण्याचा त्रास असतो. फिट्स येण्याची समस्या अनुवांशिकही असू शकते, याशिवाय मेंदूचा संसर्ग, डोकेदुखी, स्ट्रोक आणि ब्रेन ट्यूमरही याला कारणीभूत आहे. विशेषत: मेंदूतील रासायनिक आणि विद्यूत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. मेंदूमध्ये छोट्या पेशीमध्ये इलेक्ट्रीक प्रक्रिया होत असतात. यातील काही पेशी दुसर्‍या पेशींना उत्तेजित करतात. अशा स्थितीत इनहिबिटर पेशी रोखल्या जातात. या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्याने संतुलन बिघडते आणि फिट्स येण्याचा...
Gerenal

मासिक पाळीतील अनियमितता

महिलांसाठी मासिक पाळी नियमित ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जर हे नियमित नसेल तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. तसे मासिक पाळी २-४ दिवस मागेपुढे होणे सामान्य आहे. काही स्त्रियांमध्ये पाळीचा काळ निश्‍चित नसतो. जर त्यांची मासिक पाळी एका विशिष्ट वेळेत न येता खूप कालांतराने येत असेल तर या मागे अनेक कारणे असू शकतात.अनियमित दिनक्रम आणि चुकीचा आहार : मासिक पाळीचे चक्र बदलण्याचे सर्वात मोठे कारण अनियमित जीवनशैली आहे. सुस्त जीवनशैलीमुळे शरीराच्या संप्रेरकांवर देखील परिणाम होतो. अनियमित दिनक्रमांमध्ये व्यायाम न करणे, वेळेवर झोप न घेणे, वेळेवर न खाणे इत्यादींचा समावेश आहे.उच्च तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे देखील मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त म्हातारपणाचा किंवा तरुणपणाचा परिणामही मासिक पाळीवर दिसून येतो. ज्या स्त्रियांचे वय ४0 पेक्षा जास्त आहे त्यांना रजोनवृत्ती पूर्वी मासिक पाळीमध्य...
Article

मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या…!

कोरोना विषाणूमुळे मास्क घालणं आयुष्याच भाग बनून गेलं आहे. न्यू नॉर्मल असं म्हणत आपण मास्क स्वीकारलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं आवश्यक असलं तरी याचे बरेच दुष्परिणाम दिसून येतात. बराच वेळ मास्क घालणार्‍यांना त्वचेशी संबंधित आजार होतात. इतकंच नाही तर आता मास्कमुळे डोळ्यांशी संबंधित तक्रारी वाढू लागल्या आहेत. बराच काळ मास्क घातल्यानंतर डोळ्यांमध्ये होणारी जळजळ ही सर्वसामान्य बाब बनून गेली आहे. चुकीच्या पद्धतीने मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मास्क चुकीच्या पद्धतीने घातल्यास किंवा नाक उघडं राहिल्यास उच्छवासावाटे बाहेर पडणारी उष्ण हवा डोळ्यात जाऊन डोळे कोरडे पडतात. या हवेमुळे नैसर्गिक अर्शू वाळून डोळ्यांचा दाह होतो. मास्क बराच काळ घातल्यानंतर पापण्यांलगतचा जंतूसंसर्ग, बुब्बुळांचं होणारं नुकसान, मास्कवर राहिलेल्या साबणाच्या कणां...
माझी आई इंदिरा नारायण कामत
Story

माझी आई इंदिरा नारायण कामत

"प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई" महान कवी श्री माधव ज्युलियन यांनी केलेले हे वर्णन माझ्या आईशी हुबेहूब जुळत आहे. माझी आई प्रेमाने भरलेली व वात्सल्याची सिंधूच होती. आईला आम्ही "आत्या" म्हणत असू. माझे मामा, मावशी तिला आत्या म्हणायचे तेच आमच्या तोंडवळणी पडले. गोव्याच्या सावर्डेे जिल्ह्यात, काकोडा नावाचा गाव आहे. तेथे माझ्या आईचा जन्म झाला. आई धरुन सर्व अकरा भावंडे. काही मामा,मावशा माझ्या मोठ्या भावाहून लहान आहेत. माझ्या आईने स्वतः आई झाल्या नतंरही आपल्या आईची बाळंतपणे काढली होती. लहानपणी ती वडिलांची खूप लाडकी होती, कारण सर्व भावंडात ती हुशार होती. वडिलांना दुकानाच्या व शेतीच्या कामात मदत करायची. तिचे खेळ सुध्दा मुलांसारखेच होते. नदीत पोहणे, झाडावर चढणे, सायकल शर्यत लावणे, लगोरी, विटीदांडू व टाबुल फणा या सारख्या खेळात ती तरबेज होती.वयाच्या पंधराव्या वर्षी तिचे लग्न तिच्याहून बारा वर्षांन...
Article

निळ्या पाखरांची अणुउर्जा : चैत्यभूमी

निळ्या क्रांतीपाखरांना नव्या जगाची आशा दिली. क्रांतिवीर आहोत आम्ही अशी नवी महाऊर्जा दिली. काळोखाच्या गर्भावर समतेचा क्रांतीसूर्य निर्माण झाला आणि हजारो वर्षाच्या कुनियतीवर ज्ञानवंताने  जगाला नवसंजीवनी दिली. ज्यांनी सर्व हयातभर स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांनी जीवन तयार केले आणि तसेच जगले म्हणून ते या जगाचे महामानव ठरले.  भारताच्या राजकीय ,सामाजिक व वैचारिक क्षितिजावर प्रखर तेजाने चमकणारे आपल्या ज्ञान विद्वत्तेने अस्पृश्यांप्रमाणेच स्पृश्यांनाहीही पुनीत करणारे .भारताचे तपोनिधी व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी  निद्राअवस्थेतच महापरिनिर्वाण गुरुवार ता. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता आढळून आले. ही दुःखद वार्ता कानी पडताच सारा भारत विव्हळला.हा दिवस भारतीय बहुजनाला अत्यंत मोठा शोक दिवस ठरला. सर्वांचे बाबा गेले...
Article

बाबासाहेब एक चळवळ

सहा डिसेंबर १९५६ सकाळी नेहमीप्रमाणं लोकांनी वर्तमानपत्र पाहिलं.त्यात एक बातमी झळकली.अस्पृश्यांचा नेता काळाच्या पडद्याआड.खरं तर चवदार तळ्याचा जेव्हा सत्याग्रह झाला.तेव्हा ज्या ज्या वृत्तपत्रांनी बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनाला विरोध केला.त्या केशरी आणि मराठा या वृतिचपत्रांनीही वृत्ताची दखल घेत आपल्या पहिल्याच पानावर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी झळकवली होती.   डाँ बाबासाहेब एक झंजावातच होते.नव्हे तर एक चळवळ.त्या बाबासाहेबांनी कित्येक आंदोलनं करीत आपल्या अस्पृश्य जातींना त्या विटाळाच्या काळ्या बुरख्यातुन बाहेर काढले होते.दलितांना न्याय मिळवुन दिला होता.त्यापुर्वी कोणी त्या गोष्टींना परंपरा समजत होते तर कोणी त्याच गोष्टीला देवाची लीला......खरंच अस्पृश्यांना त्यांच्या हक्कापासुन वंचित करणे याला देवाची लीला कसे म्हणता येईल?तरीही उच्चवर्णीयांच्या गोटातील काही मंडळी म्हणत होती ...
Article

नक्षत्रपेरणी कवी बा.ह.मगदूम आस्वादक (परीक्षण) मुबारक उमराणी, सांगली

जगण्यातील संवेदनक्षम अनुभवाचा आशय प्रतिभाच्या अन् प्रतिमाच्या द्वारे माणसात गंधाळत चिंतनसुत्रे मांडणारा सशक्त काव्य संग्रह नक्षत्रपेरणी " नक्षत्र पेरणी " हा काव्यसंग्रह नुकतेच वाचनात आला .ह्दयाच्या व मनाच्या कप्यात लपलेल्या वेदना,दाह,निसर्ग, संकटे,दुःखमय यातना,उपासमारी,रोगराई, दुष्काळ, निराशा,सुखद घटना यांच्या बियाणांची ह्दयात अक्षरपेरणी मनाच्या सुपीक जमिनीत करत, शब्दांनी नक्षत्रांच्या रुपाने आपले विचार,भावभावनाने कवितेचा शिवार बहरत व फुलविण्यात दिसून येत आहे. विविध विषयावर कवितेद्वारे साहित्यिक मळा कणसानी बहरलेला असून साहित्याची रास करणारा असा हा सुपीक मनाचा , शब्द पेरणी करणारा कवी म्हणजे बा.ह.मगदूम सर होय. सांगली जिल्ह्यातील धुळगावचा हा अल्पभुधारक कवी अनुभव संपन्न असून मराठी मळ्यात शब्द खळखळा करीत अक्षराची फुलमाळ ज्ञानोबा तुकोबा, बहिणाबाई,छत्रपती शिवराय ,सावळा विठ्ठलाचा वारसा जपत, मराठीच...
Gerenal

वन बेडरूम फलाट

गनपत वन बेडरूम फलाट मंदी बायको,पोरासंग राहत व्हता. मस्त खुसीची जीदगानी जगत व्हता.पोराले उच्च शिक्षन देल्लं. गनपत शायेत चपराशी व्हता. ईमानदारीन नोकरी करे कोनाच्या घेन्यात ना देन्यात. पोरगं मोठ झालं थो लय मोठे मोठे सपन पाये. त्याले वाटे कां येथं काई ठिवलं नाईपरदेशात जाऊन नोकरी कराची, अन पैसा कमवाचा थेच त्याच्या डोक्सात भरलं. दोन तीन वर्ष त्यान नोकरी करुन पैसा जमवला. अन् मंग परदेशी जाचं ठरुलं. माय बाप सांगू सांगू थकले. पन नाई मले जाच मनजे जाचच. तुमी राहा इथंच वन बेडरूम फलाट मंदी. बाप मने अबे लेका तू येथच लायनाचा मोठा झाला. शिक्षन, खानपान सारं इथंच झालं अन या जनम भूमी ह्यो भारत देश सोडून चालला. तुले कंटाया आला...माय बापाचे डोये भरुन आले..जाय तुले कोठं जाचं हाय तेथं..आखीर पोरगं माय बापाचा निरोप घिवून परदेशी निंगून गेला....!!माय बाप डोक्सावर हात ठेवून मुसुमुसू रडू लागला..पोरगं परदेशात गेलं य...
Article

थेट किना-यावर….!

-"शेर लिहण्या मी मला बेभान करतो, गझ़लसाठी या जिवाचे रान करतो" "थांबते दारात माझ्या रात्र जेव्हा, चांदणे माझे तिला मी दान करतो", असे म्हणत मा.संदीपजी वाकोडे यांनी, गझ़ल रसिकांना दर्जेदार,विविधांगी,बहारदार असा 'किनारा' गझ़ल संग्रह समर्पित केला.'किनारा'. येण्याची शब्दश: वाट पाहिली. आणि एक दिवस शाळेत असतांना घरुन फोन आला , 'किनारा' घरी पोहचल्याचा. 'किनारा' हातात घेतला , वाटलं जणू गझ़लेच्या प्रशांत सागरास शब्दांचे अर्ध्य देण्यास सज्ज झालाय 'किनारा'.समर्पक आणि न्याय्य असे शिर्षक असलेला,माननीय संदीपजी वाकोडे यांचा गझ़ल संग्रह 'किनारा'सर्वप्रथम 'किनाराकाराचे ' मन:पुर्वक अभिनंदन!   किना-याचे मुखपृष्ठ आकर्षक आणि प्रतिकात्मक आहे.मलपृष्ठावरची 'गझ़लनवाज़ आदरणीय भिमरावजी पांचाळे' ,यांची भरभरून कौतुक करणारी दाद ,किना-याच्या समृध्दीत भर टाकते.अर्पणपत्रिकेत कुटूंबाविषयीची माया,मुर्तिजापूरच्या मातीचा रास्त ...