दारूबंदी….!
मी अशा एका देशात राहते की, ज्या देशात 2020 या वर्षी covid-19 सारख्या भयानक रोगांचा सहवास होता. घरातून बाहेर सुद्धा जाता येत नव्हत. असं म्हणतात की आपल्या देशाचा कायदा खूप कडक असतो. पण तस वागणार कोणी नाही. आत्ता दारूचं बघा ना..तेवढ्या कडक lockdown मध्ये सुद्धा आपल्या सरकार ने दारू विकायला परवानगी दिली. का ? कारण देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची होती. आपला देश हा विकसनशील मार्गावर आहे. माझा हा मुद्दा नाही की सरकार कसं आहे. काय आहे. मला माझ्या लेखातून एवढंच सांगायचं आहे की, आपल्या देशात जास्त प्रमाणात दारूची विक्री केली जाते.एकदा जर माणूस दारू प्यायला ना तो पूर्णपणे दारूच्या आहारी जातो.
आपल्याला असे अनेक किस्से ऐकण्यात येतात, की दारूमुळे घरदार उध्वस्त झालं, नोकऱ्या गेल्या, पण हे सर्वसामन्यांना परवडत नाही...मी तुम्हाला एक माझ्या सोबतच किस्सा सांगते. मी जेव्हा शाळेत शिकत होते ना. तेव्हा ground च...
