पिंपळखुटा/स्वाती इंगळे
अंजनसिंगी ते पिंपळखुटा-मंगरूळ दस्तगिर रस्ता दुरुस्ती च्या मागणीचे निवेदन धामणगाव-चांदुर रेल्वेचे विधानसभा सदस्य आमदार प्रतापदादा अडसड यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
अंजनसिंगी ते पिंपळखुटा रस्ता अतिशय खराब झाला असून पायदळ चालणे अवघड आहे. विशेष म्हणजे पिंपळखुटा येथे शाळा ज्युनियर सिनियर कॉलेज आणि कृषी महाविद्यालय आहे. त्यामुळे आजूबाजूचे गावातील मुलं येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच श्रीसंत शंकर महाराज आश्रम असल्याने भाविक भक्तांची सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.एसटी मर्यादित वेळेसच बसेज असल्याने अधिकांश मुलं मुली भाविक भक्त सायकल-मोटार सायकल किंवा पायदळ ये-जा करतात. परंतु रस्ता अतिशय खराब झाल्याने ये जा करण्यास अडचणीचे ठरत आहे. तसेच अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
या रस्त्याच्या दुर्दशेबाबतीत pwd धामणगाव रेल्वे चे अभियंता यांना सुद्धा वारंवार निवेदन दिले आहे परंतु त्यांनी सुद्धा या मागणी कडे दुर्लक्ष केले आहे असे गावकऱ्यांचे मनने आहे.
सध्या पावसाळा असल्याने हा रस्त्याची अधिकच दुर्दशा झली. जागोजागी खड्डे पडले आहे. गिट्टी उखडली आहे. रस्त्याची दुर्दशा लक्षात घेता ह्या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी निवेदनात केली आहे
—————————
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी
२७ जुलै रोजी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेले.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई बाबतीत अवगत करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी सुरज गंथडे रवी उगले दादाराव बेदूरकर प्रशांत टांगले अमित राऊत रोशन रुद्राकार अनिल गावंडे आदी गावकरी उपस्थित होते.