अँग्री यंग मॅन जरांगे पाटील.!
जरांगे पाटील यांच्या मूळे मराठा नेत्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. हा मराठा गडी सरकारला नडला आणि भिडला जरी असला, अस वाटत असल तरी, त्याने “,आरक्षण आणि मराठा समाज” ह्याचा खूप सखोल अभ्यास केला असल्याचं सरकार ज्या वेळी बॅकफूटवर गेलं त्या वेळीच समजलं. दुसर म्हणजे जे काय बोलायचं ते जनतेसमोर! पडद्या आड अजिबात चर्चा नको. हा पारदर्शक पणा जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनवून गेला जरी असला तरी ही, स्वार्थासाठी मराठा समाजाच्या बंद दारा आड राजकारण करणाऱ्या मराठा संघटना आणि मराठा नेते यांच्या डोळ्यात मात्र जरांगे पाटील खुपु लागले आहेत.
जरांगे पाटील यांचा स्पष्टवक्तेपणा आज मराठा समाजाला खूप भावत असून मराठा समाज त्यांच्याकडे खूप आशेने पहात आहे. कितीतरी वेळा मुख्यमंत्री मराठा बहुसंख्य आमदार मराठा , तरी ही आरक्षण नाही ही सल गोर गरीब मराठा समाजाच्या मनात सलत होती.त्यातून लाखोंचे मोर्चे निघाले परंतु हाती काय आलं? काहीच नाही. हा राग मनात मराठा समाज धरून बसला होता. आणि तो कुठे व्यक्त करायचा कसा करायचा याची तो वाट पहातच होता. तो राग व्यक्त करून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी व्यासपीठ निर्माण करून दिलं.
जरांगे पाटील यांनी जी मागणी केलीत्या विरोधात काही माराठेतर पुढारी बरळत सुटले. आणि मराठा पुढारी गप्प राहिले . ह्याचा चाणाक्ष पणे जरांगे पाटील यांनी आपल्या सभा मधून समाचार घेतला. त्या मुळे मराठा समाजाच्या मनात आणखी जरांगे पाटील यांच्या बद्दल मोठीप्रतिमा निर्माण झाली. कधी काळी अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही सिनेमातील इमेज जशी जनतेच्या मनात घर करून गेली . कुणी तरी अन्याया विरोधात लढतोय. हे सुखावुन गेलं. अगदी तसच जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला मिळाल.
आता १४ तारखेला जे आंदोलन आणि सभा आहे त्यात नेमकी जरांगे पाटील कोणती भूमिका मांडतात आणि व्यासपीठावर नेमकं कोण कोण असेल ह्यावर ही बरच काही अवलंबून असणार. खर तर आपला वापर होणार नाही ह्याची काळजी जरांगे पाटील नक्कीच घेतील तितके मुरब्बी आणि चाणाक्ष तर आहेतच. जास्तीत जास्त संख्येने ज्या वेळी मराठा गोळा होईल त्या वेळी राजकीय पक्षाच्या पोटात नक्कीच भला मोठा गोळा आल्या शिवाय राहणार नाही. सरकार ने आरक्षण दिलं नाही तर, जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जर मराठा उमेदवार निवडणुकीत उभे केले तर नक्कीच काही राजकीय नेते आणि मराठा समाजात असलेल्या घराणेशाहीचे इंडिकेटर लागले म्हणून समजा. मराठवाड्यात नक्कीच जरांगे पाटील बऱ्याच जागा विधानसभेच्या काढू शकतात. जर आरक्षण दिलं नाही तर हीच रणनीती आणावी हे माझं वयक्तिक मराठा म्हणून मत आहे.
बाकी तुम्ही ही या….१४ तारखेला. ठिकाण माहीत असेलच .
-अशोक पवार
गटेवाडी पारनेर नगर
8369117148