
किर्तन उद्योग आणि प्रगती..!
तशी
तमाशानं माणसं
बिघडली नाहीत..
पण त्या नादात अखंड
बुडणाऱ्याला
विकावी लागली
थोडी फारशेती..
आणि
तमाशगीरांना
मिळवता आली जेमतेम
पोटापुरती रोजी-रोटी..!
अन…
किर्तनानं माणसं
सुधरली नाहीत..
मात्र
सुधरली तेवढी
किर्तनकाराची
आर्थिक
परिस्थिती…
आणि
किर्तनउद्योगाला
मिळाली नवी गती…!

-नंदू वानखडे
मुंगळा जि.वाशिम
9423650468
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!