
प्रवासासाठी किंवा कामानिमित्त अनेकजण वेगवेगळ्या शहरांत मुक्काम करतात. मात्र हॉटेलचं वाढतं भाडं अनेकदा खिशाला चटका लावतं. पण जर तुम्हाला सांगितलं की जगात असं एक हॉटेल आहे जिथे केवळ २० रुपयांत एक रात्र मुक्काम करता येतो तर? होय! पाकिस्तानमधील पेशावर शहरात असलेलं हे अनोखं हॉटेल सध्या जगभर चर्चेत आहे.
या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी फक्त ७० पाकिस्तानी रुपये, म्हणजेच अंदाजे २० भारतीय रुपये आकारले जातात. एवढ्या कमी दरात कोणत्या सुविधा मिळतात हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
या हॉटेलच्या खास सुविधा या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी एक खाट, स्वच्छ चादर, पंखा, कॉमन बाथरूम आणि मोफत चहा या सुविधा दिल्या जातात. मात्र येथे खोली नसून झोपण्यासाठी इमारतीच्या छतावर जागा दिली जाते. म्हणजेच प्रवासी आकाशातील तारे पाहत झोपतात एक वेगळाच अनुभव!
हे हॉटेल पारंपरिक पश्तून वास्तुकलेने बांधलेलं आहे आणि ते विटा व दगडांनी बनवलेलं आहे. येथे दररोज ५० ते १०० प्रवासी मुक्कामी असतात, ज्यांपैकी अनेकजण परदेशी पर्यटक आहेत.
ट्रॅव्हल व्लॉगर डेव्हिड सिम्पसन यांनी या हॉटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो इंस्टाग्राम, टिकटॉक आणि युट्यूबवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तानातील पर्यटनाला नवी ओळख मिळाली आहे आणि कमी बजेटमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी हे हॉटेल आकर्षण ठरत आहे.
‘हे’ आहे जगातील सर्वात स्वस्त हॉटेल…