• Tue. Jun 6th, 2023

मिरुग

ऊन सावलीचा खेय
कशी खेयते रोहयनी
अंगाची लाही लाही
कुठे बरसते पाणी !
गाण पावसाच ओठी
आल्या मिरगाच्या सरी
काळा टपोरा मिरूग
आला माहया दारी !
मनी आनंदला धनी
हर्ष मायेना पोटात
साता कुयाच दैवत
आज आलया दारात !
काळाकाळा दोन सोंडी
जिव तळहाती घेतला
मिरूग दुत निसर्गाचा
त्याने देव्हारी मांडला !
जलाभिषेक केला त्यासी
हळदी कुंकूवाने पुजन
मिरगा बरसुदेगा मिरूग
हिरवं होऊदेगा रान !
नदि ओहोळ वाहुदे
देवा पिकुदेगा रान
धनीन धन्यासवे मांगे
हात जोडुनिया दान !
सोंड पसरुनि पंख
मिरूग उडोनिया गेला
पाणी मावेना रानात
मिरूग बरसून गेला !
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
उन्नती नगर अकोला.9923488556

(Images Credit : Sakal)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *