- * १ फेब्रुवारी पासून मालमत्तेची जप्तीची कार्यवाही सुरु करण्यात येणार
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३१ जानेवारी, २०२३ पर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम व २५ टक्के शास्तीचा रक्कम भरणा केल्यास त्यांना ७५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात शास्तीच्या रक्कमेवर सूट मिळणार असून ७५ टक्के सुट ही फक्त ३१ जानेवारी पर्यंतच लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या संकलन केंद्रावरही रोख, धनादेश, धनाकर्ष, क्रेडीट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातूनही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. महानगरपालिकेची कर संकलन केंद्र शनिवार व रविवार सुरु ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपला मालमत्ता कर न भरल्यास दिनांक १ फेब्रुवारी,२०२३ पासून मालमत्तेची जप्तीची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.
पुनर्गणणेअंती मालमत्ता कराची रक्कम व सवलत वगळून उर्वरित दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरणे अनिवार्य आहे. टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रक्कमेस विशेष योजना लागू राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–