यवतमाळ:एका दिवसात एक-दोन मृत्यू होत असतानाच आता हा आकडा एका दिवशी तब्बल १४ मृत्यूंवर जावून पोहचला आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अत्यंत तोकड्या पडत असलेल्या या ठिकाणी दिसून येत आहे. अशा स्थितीत यासंदर्भात कठोर अंमलबजावणी न झाल्यास कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. एका दिवसात एक-दोन मृत्यू होत असतानाच आता हा आकडा एका दिवशी तब्बल १४ मृत्यूंवर जावून पोहचला आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अत्यंत तोकड्या पडत असलेल्या या ठिकाणी दिसून येत आहे. अशा स्थितीत यासंदर्भात कठोर अंमलबजावणी न झाल्यास कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे मृत्यू झाले. इतर मृत्यूही मोठ्या संख्येने झाले. त्यामुळे पांढरकवडा मार्गावरच्या हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. अखेर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी ओट्यांसोबतच ओट्यांच्या बाजूला खाली काही चिता रचून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्ह्यात फोफावत असलेल्या कोरोनाने आता मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. त्यात दरदिवशी मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. त्यातच शहरातील प्रभाग क्रमांक २७ चे नगर पालिका सदस्य राजू केराम यांचाही कोरोनामुळे मृत्यु झाला. गेल्या वेळी पार पडलेल्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते.
Related Stories
October 9, 2024