- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जे महान कार्य केले ते अनमोल असून त्यांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्नेहल विरूळकर या आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटत असतात. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमामुळे त्यांची शाळा आज प्रगतीचे शिखर गाठत आहे,त्या एक आदर्श मुख्याध्यापिका आहेत.
त्याचबरोबर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.शिक्षण विभागाच्या अनेक समित्यांच्या त्या सदस्य आहेत. त्यांना जाहीर झालेल्या या सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारामुळे आदर्श प्राथमिक शाळेच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला जात आहे. हा पुरस्कार त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देत राहणार आहे असे प्रतिपादन वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी केले.
ते आदर्श प्राथमिक शाळा, खापर्डे बगीचा,अमरावती येथील मुख्याध्यापिका सौ.स्नेहल राजूभाऊ विरुळकर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आयोजित सत्काराच्या प्रसंगी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रमुख अतिथी, आदर्श अभ्यासाचे तंत्र कर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, प्रा. एन.आर. होले, श्री .वसंतराव भडके व सत्कारमूर्ती मुख्याध्यापिका सौ. स्नेहल विरूळकर होत्या. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून सत्कारमूर्ती सौ.स्नेहल विरुळकर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपेक्षित समाज महासंघ व कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे शाल,पुष्पगुच्छ, प्रा . अरुण बुंदेले लिखित “आदर्श अभ्यासाचे तंत्र” व “निखारा”हा काव्यसंग्रह देऊन महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बुंदेले, प्रा. एन. आर. होले, श्री. वसंतराव भडके यांनी सत्कार केला. सोबतच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सौ .मेघा रवींद्र फुसे, सौ.रेखा राजेंद्रा राजूरकर, सौ. मीना सुभाष उदापुरे या सावित्रीच्या लेकींचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष भाषणात समाजभूषण प्रा .श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की ,”फुले दांपत्यांनी पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करून आज १७५ वर्षे होत आहेत.या १७५ वर्षांमध्ये महिलांमध्ये जी प्रगती झाली, जी विकासाची द्वारे मुक्त झाली ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळेच सौ. स्नेहल विरुळकर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला.” असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा. एन.आर. होले व श्री वसंतराव भडके यांनी विचार व्यक्त केले. सत्कारमूर्ती सौ . स्नेहल विरूळकर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “मला मिळालेला पुरस्कार हा विद्यार्थ्यांना समर्पित करणार आहे. बालशिक्षण मंडळाच्या संस्थापिका कै.माई हर्षे यांनी १९४७ ला महिला व बालक यांची प्रगती व्हावी. समाजामध्ये त्यांना एक मानाचे स्थान मिळावे, त्याचबरोबर तळागळातील उपेक्षित जनतेला शिक्षणाच्या प्रवाहात येता यावे या उदात्त हेतूने संस्थेची स्थापना केली. शिक्षणाबरोबर संस्कार देणारी शाळा म्हणून गेल्या ५४ वर्षापासून अमरावती शहरात उत्कृष्ट काम करणारी आदर्श प्राथमिक शाळा आहे. माईंनी सांगितलेला वसा घेऊनच आम्ही सर्व महिला शिक्षिका हे पवित्र काम करीत आहोत.” असे विचार व्यक्त केले.
शाळेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अतिशय उत्कृष्ट काम सौ. विरूळकर मॅडम यांनी केलेले आहे.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मीना उदापुरे व आभार श्रीमती शिल्पा गणोरकर यांनी मानले. याप्रसंगी सर्व श्रीमती. निलिमा आष्टिकर, डॉ.कीर्ती पिंजरकर, साधना खंडेझोड, राजुल राऊळ, वैशाली पंत, सुनिता बेलोरे, मनीषा लंके, सोनाली पिंपळकर, ममता वर्मा, शिल्पा गणोरकर, ममता वैराळे, वंदना देऊळकर,तृप्ती पणजकर, मीना उदापुरे, श्री सुरेंद्र मोहोड यांची उपस्थिती होती.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–