- सोयीचं सुख आणि दुःख
- सोयीचीच माणसे
- अवतीभवती माझ्या,
- निवडही माझीच
- अडचण ही मलाच,,,
- सोयरे सोयीचेच सारे
- सुख ,दुःख सोयीचेच त्यांचे
- आणि माझेही,
- अकारण दोष देण्यासाठी
- करून ठेवलेली सोयच ती,
- सवयीच्या जगण्याची
- सोय करून ठेवण्यासाठी,
- किती ही धडपड,
- सोयीसाठी,, मन मारून
- माणसे जपतो आम्ही,
- ती पण सोयीचीच,
- अनोळखी प्रदेशात,
- वावरतो आम्ही मनाने
- पण शरीराला सोयीच्या च
- ठिकाणी आणून टेकवतो,शेवटी,
- सोय, सोय, सोय, सोय,
- सर्व ठिकाणी माझी सोय
- कोणीही अनोळखी येऊन
- माझ्या सोयीच्या प्रदेशात,
- जर आक्रमण केले तर,
- माझ्यातला मानवी हक्क
- कार्यकर्ता जिवंत होतो,
- हक्कासाठी लढतो,,माझ्याच,
- शिक्षणाला पूर्णपणे वापरतो मी,
- सोयीसाठी ,सोयी मिळवण्यासाठी
- माझ्या अवतीभवती गोतावळा,
- सोयींचाच माझा,
- सुख आणि दुःख, सोयीचेच माझे
- आणि त्यांचे ही,,,,ते ही माझ्या सोयीने असेल तर,
- निलेश रामभाऊ मोरे
- मु,पो,मनभा ता,कारंजा लाड
- जिल्हा वाशीम 444105