- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहिर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये अमरावतीच्या पल्लवी देविदास चिंचखेडे हिने यश संपादन केले आहे. तिच्या या चमकदार कामगीरीची दखल घेत श्री. सुनिल वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती, श्री. भाऊराव चव्हाण, सहाय्यक आयुक्त, यवतमाळ, श्री. एम.जे.वाठ, सहाय्यक आयुक्त, वाशिम, डॉ. अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त, बुलडाणा व अकोला, व श्रीमती माया केदार, सहाय्यक आयुक्त अमरावती यांनी पल्लवीच्या घरी पुष्पगुच्छा देऊन तिचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संवाद साधतांना पल्लवीने बि. टेक. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन काही काळ कंपनीमध्ये नोकरी केली. व मोठया पगाराची नोकरी सोडुन जिद्दीने तिने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेकरीता आपला मोर्चा वळविला व चिकाटीने अभ्यास करुन आज हे नेत्रदिपक यश संपादन केले. तिच्या शैक्षणिक प्रवासात समाज कल्याण विभागाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ तिला मिळाला व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी वार्टी यांचे मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ तिला मिळाला. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून नियमित जिद्दीने प्रयत्न केल्यास आपले ध्येय गाठले जाऊ शकते अशा भावना तिने व्यक्त केल्यात. यावेळी पल्ल्वीचे आई, वडिल, भाऊ, बहिण व मोठया संख्येने तिचे कौतुक करण्याकरीता आलेले हितचिंतक उपस्थित होते.