- श्रीमंती घराची मोजू नका केवळ
- पाहून बाहेरील मर्सडीज, कार
- श्रीमंती घरातील मोजा जर
- आनंदी असतील आईबाप फार.
- दाराबाहेर गाड्या, कुत्रा ठेवायला
- असते खूप भरपूर अशी जागा
- कोण सांगेन यांना मग
- आईबापाशी आदराने वागा ?
- घरातील म्हातारी माणसे
- दिसत नाही कधीच हसता
- श्रीमंती ही वरवरची मग
- का म्हणून तुम्ही पुसता.?
- आईबापांच्या चेहऱ्यावर दिसले
- हसतमुख सारे सारे भाव
- तरच समजा मग तुम्ही
- श्रीमंतात त्या घराचं खरं नाव.
- आईबापांना दुखावण्याचा
- करू नका कधी गुन्हा
- श्रीमंती तर परत येईल
- पण आईबाप येतील का पुन्हा ?
- कवी : गणेश रामदास निकम
- मो.न.७०५७९०४६७७, ९८३४३६१३६४