- अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती शहरातील लोअर झोनमधील पाणीपुरवठा आजपासून सुरू करण्यात आला असून, लवकरच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता अजय वि. लोखंडे यांनी दिली.
दरम्यान, काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शहराचा पाणी पुरवठा पुन्हा दोन दिवस बंद राहणार असल्याचा चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये. प्रत्यक्षात शहरातील लोअर झोनमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला आहे व लवकरच सर्व ठिकाणी पुरवठा पूर्ववत होईल, असे उपकार्यकारी अभियंता श्री. लोखंडे यांनी सांगितले.