- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित, वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत नुकतेच श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी, गोपालकाला व पालक भगिनींकरिता गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा डॉ.सौ. माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पालक भगिनी, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यावेळी शाळेत बालगोपालांसाठी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असल्यामुळे बरेच विद्यार्थी या दिवशी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत शाळेत आले होते. गरबा स्पर्धेकरिता यशोदा मातेच्या वेशभूषेत आलेल्या माता पालक भगिनी ज्योती तायडे, अनिता ताथोड, दिपाली किरेकार, ज्योती झांजोटे, कविता अनासाने, दीपमाला बांगर, अश्विनी टपके, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार यांच्या हस्ते गोपाल कृष्ण व दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेतील सर्व महिला शिक्षिका व माता पालक भगिनी यांनी गरबा नृत्याचे उत्तमरीत्या प्रस्तुतीकरण करून कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद घेतला. राधा कृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनीही छान गोलाकारात् नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. गोकुलमय झालेली शाळा, बालगोपाल व नटून थटून आलेल्या छोट्या छोट्या राधांना बघून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली व राधाकृष्णां सोबत आपापल्या सेल्फी घेतल्या.
चारही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी बरीच मेहनत यावेळी केली. शेवटी वेदांत नरेश डहाके या इयत्ता चौथीतील विद्यार्थी व त्याच्या चमुने दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला. शेवटी गोपाळकाला वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी अंकुश यादव, अरहान खान इमरान खान, कार्तिक वानखडे, शिवम महल्ले, नाविन्य रामटेके, दर्शना तांबे, सिदरा बैनिश शेख जहूर, प्राजक्ता बांगर, विजय अनासाने, भावीन माहुरे, अमन लांडगे, पार्थ मेश्राम, आशय राणे, कनक झांजोटे, वैभव सहारे, अंशु लोहार, नयन डहाके, सृष्टी यादव, खुशी अटाळकर, प्रगती महल्ले, श्रावणी पुसदकर, शुभांगी बहिरे, सर्वज्ञ कडू, स्वरूप सूर्यवंशी, नवीन चचाने, ऐश्वर्य नागपुरे, सिद्धार्थ तायडे, अर्णव मेश्राम, पूर्वजा सगने, धनश्री राऊत, आराध्या दळवी, वीरा झांजोटे, भाग्य राऊत, अथर्व अनासाने, कृष्णा साहू, चंचल भलावी, नियती साहू, नक्ष वर्जे, उन्नती खंडारे, पिहल घोडे, नव्या कोहळे, ओजस्वी वरघट, शिवण्या घाटोळ, सोहम गंगारे इत्यादी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा साकारून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तर पालक भगिनी देविका पाचपोर, दिपाली महल्ले, विजया तायवाडे, दिपाली किरेकार, ज्योती झांजोटे, कविता अनासाने, स्नेहा बगेकार, दीपमाला बांगर, माधुरी दळवी, अर्चना राऊत, अश्विनी टपके, अनिता राठोड, विजया तायवाडे इत्यादी माता पालक भगिनी यांना गरबा स्पर्धेची प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता योगेंद्र यादव, मोनिका पाटील, ज्योती मडावी, सुजित खोजरे, आसावरी सोवळे, सचिन वंदे, संध्या कुरहेकर, श्रद्धा मोहतुरे, मनीषा श्रीराव, दिपाली गंगारे, विलास देठे, अमोल पाचपोर इत्यादी सर्वांनी अथक परिश्रम घेतले.