- * सर्वसमावेशक, सुलभ व सहभागपूर्ण निवडणूका
- * राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यक्रम
अमरावती : राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या उपस्थितीत विविध अधिकारी व कर्मचा-यांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम झाला. देशातील लोकशाही परंपरा बळकट करण्याच्या व मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणूकांचे पावित्र्य राखण्याबाबत शपथ सर्वांनी घेतली. उपायुक्त गजेंद्र बावणे, तहसीलदार वैशाली पाथरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.