नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत एका महिन्यात मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण अचानक कसे वाढले? याचे उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहे. कोरोनावरील लस आली आहे. आता सर्व काही ठीक होईल, असे नागरिकांना वाटत आहे. नागरिकांना आता कोरोना या संसर्गाचे गांभीर्य राहिलेले नाही. लोकांमधील कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला आहे. ते सहजतेने घेत आहेत. यातूनच सुपर स्प्रेडरच्या घटना घडत आहे, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीत कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोरोनावरील लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणं ही दुर्मिळ घटना आहे. पण कोरोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असेल तर जीवाला असलेला धोका कमी असतो. सर्व परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्याची प्रक्रिया आता निश्चित झाली आहे.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024