Skip to content
शिवबाची गुरु । शिवबाची माता ॥ प्रकाशाच्या वाता । पेटविल्या ॥
धैर्यशील माता । स्वराज्य प्रेरक ॥ ध्यानीमनी एक । ध्येयवाद ॥
शिवबा संभाजी । जिजाऊ संस्कार ॥ करी तलवार । तरबेज ॥
संस्कार सुंदर । आदर्श जीवन ॥ शिवबाचे मन । घडविले ॥
मुलामुलींवर । जिजाऊ संस्कार ॥ थोर ते विचार । आचरावे ॥
प्रजा नि मावळे । स्वराज्याचे धन ॥ शिवबाचे तन । घडविले ॥
मायाळू ममता । तन कणखर ॥ खड्गाचे वार । करितसे ॥
सिंदखेड राजा । एक मातृतिर्थ ॥ जीवनाचा अर्थ । कळतसे ॥
शंभुशिवबांची । वात्सल्याची मूर्ती ॥ गाऊ सर्व किर्ती । जिजामाता ॥
राज घराण्याची । जिजा राजमाता ॥ पेटविल्या वाता । सुराज्यात॥
स्मृतिंना मूंल्यांना । जपावे आपण ॥ घडवावे जन । जीवनात ॥
जिजामाता एक । स्वराज्य जननी ॥ गाऊनिया गाणी । जन्मदिनी॥Vत्याग समर्पण । भाव मूर्तिमंत ॥ प्रेरणेचे स्त्रोत । जिजामाता ॥
संपविले भेद । समतेचे राज ॥ बंधुतेचा साज । स्वराज्यात ॥
स्वराज्य रक्षण । नीती अधिष्ठान ॥ कर्माचा सन्मान । दरबारी ॥
जन्मदिनी आज । करितो नमन ॥ कराने वंदन । कोटी कोटी ॥
महात्मा जोतीराव फुले राजस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
-प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Like this:
Like Loading...