- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दिन युवा सप्ताहाला कालपासून सुरुवात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस 12 जानेवारी हा संपूर्ण देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. युवकांचा सर्वांगिण विकास करणे तसेच राष्ट्रीय व सामाजिक कार्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
युवा सप्ताह 19 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत 15 ते 29 या वयोगटातील युवक, युवतींसाठी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. स्वामी विवेकानंदांचे कार्य, तत्वज्ञान, विचार यावर युवकांना प्रबोधन, निबंध स्पर्धेचे आयोजन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्यायामाचे महत्त्व सूर्य नमस्कार करणे, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिरांतर्गत स्पर्धा परीक्षेचे आयोजन याबाबींचा समावेश राहणार आहे. या उपक्रमाचा अहवाल प्राचार्य, मुख्याध्यापक, अध्यक्ष, सचिव, संस्था, महाविद्यालय तसेच मंडळे यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी यांनी केले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–