- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
बदलापूर (प्रतिनिधी) : महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन दीपक जननबंधु यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित, चळवळीच्या आणि परिवर्तनाच्या स्वरचित कविता आणि गजल काव्यफुलांनी प्रमुख मार्गदर्शक जीवन संघर्षकार साहित्यिक नवनाथ रणखांबे (कल्याण), साहित्यिक जगदेव भटु (भिवंडी), कवी गजलकर नरेश जाधव (भिवंडी), कवी शाम बैसाने यांच्या काव्य फुलांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.
पुढिल कार्यक्रमात सुभाष खैरनार यांनी बाबासाहेबांचे भारत देशासाठी दिलेले योगदान, सच्चे राष्ट्रभक्त, “गोलमेज परिषदेत इंग्रजांनी भारताची आर्थिक लूट थांबवावी.” या आणि अश्या बाबासाहेबांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. दीपक जनबंधु गौतम बचुटे शोभा ढाकरगे, अहिरे ताई, कुमारी प्रांजल बनकर गीत गायन केले तर उर्मिला खैरनार व कुमारी प्रमिला यांची भाषणे झाली. यावेळी प्रताप नितनवरे आणि अशोक कांबळे उपस्थित होते. पदाधिकारीसुरेश गोरे, सुदाम साळुंखे, पडघामोल बाबा, संदिप कांबळे, निशिकांत घोडके, त्र्यंबक खरात, विलास पडघामोल, तुकाराम माळी, लोखंडे आण्णा, टोंपे साहेब, ढोके साहेब, कांबळे बाबा,मिलींद इंगळे, यांनी कार्यक्रमाची धुरा वाहिली.
महिला पदाधिकारी शर्मिला सहारे, अश्विनी बचुटे, सरिता खैरनार, शोभा गोरे, लता निकम , अल्का जनबंधू, कमल साळुंखे , शितल बनकर दुपटे, प्रिया भैसारे, सवणे, म्हस्के, जयश्री पडघामोल, इंगळे स्नेहा शहारे, ज्योती साळुंखे, यांचे योगदान लाभले तर कुणाल बचुटे, अनिकेत खैरनार, सुदेश गोरे, निखिल बचुटे, भूमिका खैरनार, सूरज गोरे, दामिनी जनबंधू, प्रियंका गोरे, श्रेया खैरनार, सशांक कांबळे इ. तरुण पिढीने कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.मोठ्या संख्येने बदलापूरकर रहिवासी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, प्रस्तावना, वंदना सूत्र पठण आभार, उद्योजक, शिघ्र कवी सुभाष खैरनार यांनी केले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–