नवी दिल्ली : एकीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसच्या देशातील आकड्याने धक्काच दिला आहे. देशात म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर ५0 टक्के आहे. गेल्या तीन आठवड्यांत या आजाराने २१00 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. तर १५0 टक्के प्रकरणे वाढून आकडा ३१ हजारांच्या पार गेला आहे.
गेल्या तीन आठवड्यांतच देशात ३१,२१६ ब्लॅग फंगस रुग्णांची नोंद झाली आहे तर २,१0९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ दर दिवसाला १00 तर दर तासाला चार रुग्णांचा हा आजार जीव घेतो आहे. देशातील सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहे. राज्यात ७,0५७ प्रकरणे आणि ६0९ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर गुजरात आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे ५,४१८ आणि २,९७६ रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये ३२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय छत्तीसगड, उत्तर प्रदेशमध्येही बरीच प्रकरणे आहेत.
ब्लॅक फंगस हे गंभीर असे फंगल इन्फेक्शन आहे. कोरोनातून बर्या झालेल्या रुग्णांना ही समस्या उद्धवते आहे. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि मधुमेह आहे, अशा रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमध्ये हा आजार होतो आहे.
म्युकरमायकोसिस दुर्मीळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या, तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणार्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस होणे तसेच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणे अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-१९ मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असे डॉक्टर्सचे म्हणणे आहे. कोविड-१९ मधून चांगल्या पद्धतीने बरे होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणे ही काळजीची बाब आहे, असे याआधी सर गंगाराम हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024