- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड येथील माजी गटशिक्षणाधिकारी तथा ‘आठवणींचे गाठोडं’कार सुप्रसिद्ध लेखक मोतीराम राठोड यांनी लिहिलेल्या ‘गोरमाटी लोकजीवन: काल आणि आज’ या ग्रंथाला नागपूर येथील पद्मगंधा प्रतिष्ठानचा पद्मगंधा साहित्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
नागपूर येथील पद्मगंधा प्रतिष्ठानच्या सचिव संगीता वाईकर यांनी नुकतेच लेखक मोतीराम राठोड यांना पुरस्कार जाहीर झाला असल्याचे पत्र पाठविले असून येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी नागपूर येथे होणाऱ्या विशेष समारंभात त्यांना सदरील पुरस्कार दिला जाणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे. संवेदनशील मनाचे लेखक असलेल्या मोतीराम राठोड यांना यापूर्वी नांदेड येथील प्रसाद बन साहित्य पुरस्कार तसेच अक्षरोदय साहित्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले असून, ‘आठवणींचे गाठोडं’ या त्यांच्या आत्मकथनाला महाराष्ट्रातील विविध नामांकित संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.
‘गोरमाटी लोकजीवन: काल आणि आज’ या संशोधन ग्रंथाला अत्यंत प्रतिष्ठेचा पद्मगंधा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ जगदीश कदम,विजय वाकडे काका, डॉ. प्राचार्य विजय पवार,डॉ . संगीता अवचार,दिगांबर कदम ,गोविंदराव अवचार,डॉ माधव जाधव, सुनिल डोईबळे, शिवाजी कपाळे ,डॉ विलास ढवळे, विठ्ठल आचणे, सर्व विद्यार्थी मंडळी व मित्रमंडळी तसेच अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, ह. भ. प. डॉ. अनिल मुंढे, विद्रोही कवी डॉ. मारोती कसाब तसेच विविध चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी मोतीराम राठोड यांचे अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–