- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
पुणे (प्रतिनिधी) : एस. एफ. पॉझिटीव्ह मेंटल हेल्थ इंस्टीट्यूट, पुणे या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “मैत्र मनाचे सन्मान’’ हा जेष्ठ मानस तज्ञांना व जेष्ठ मनोविकार तज्ञांना मानसिक आरोग्यात योगदान दिल्या बद्दल सन्मानित करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे.
या वर्षी जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, जेष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पांडे आणि जेष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. अनुराधा सोवनी या तीन तज्ञांना, जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे, जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, ब्रिगेडियर जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ/ पेठे व संस्थेचे संस्थापक संचालक मानसतज्ज्ञ राजेश अलोणे यांच्या हस्ते दि. ५ मार्च २३ रोजी डॉ. संचेती सभागृह, डॉ. नितू मांडके, आय. एम. ए. इमारत, टिळक रोड, पुणे येथे देण्यात आला.
यावेळी पुण्यातील जेष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. भारती राजगुरू, डॉ. मेधा कुमठेकर, डॉ. मानसी राजहंसे तसेच, ज्येष्ठ लैंगिक समस्या तज्ज्ञ डॉ. लिना मोहाडीकर, प्रसिद्ध लेखिका नीलांबरी जोशी, डॉ. चंद्रशेखर पांडे यांच्या स्नुषा लीना पांडे सुद्धा उपस्थित होत्या. मानसोपचार तज्ज्ञ अनुराधा करकरे यानी सन्मानाचे मानकरी डॉ. उल्हास लुकतुके आणि डॉ. अनुराधा सोवनी या दोघांची त्यांच्या खुमासदार शैलीत मुलाखत घेतली. जेष्ठ मानस तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पांडे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांना त्यांच्या राहत्या घरी नागपूर येथे जाऊन जेष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे, जेष्ठ मानस तज्ज्ञ डॉ. भारती राजगुरू व डॉ. शिशिर पळसापुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना डॉ. सुधीर भावे म्हणाले की, डॉ. चंद्रशेकर पांडे हे भारतातील अग्रगण्य आर. ई. बी. टी. थेरपिस्ट आहेत. ते प्रत्यक्ष आर. ई.बी. टी तत्वे घेऊन जगले. ते व त्यांच्या पत्नी या दोघांच्या सुजाण पालकत्वामुळे त्यांची मुले उच्च शिक्षित झालीत व त्यांचे थोरले चिरंजीव लेफ्टनंट जनरल श्री. मनोज चंद्रशेखर पांडे हे सध्या आपल्या देशाचे लष्कर प्रमुख आहेत व दुसरा मुलगा संकेत पांडे लष्करातून कर्नल म्हणून निवृत्त झाले तर अक्षय मनोज पांडे ते सुद्धा भारतीय वायूसेनेमध्ये ऑफिसर म्हणून देशसेवा करत आहेत. डॉ. केतन पांडे हे परदेशात स्थित झाले आहेत. अश्या थोर व्यक्तीचा सन्मान माझ्या हस्ते होणे म्हणजे हा माझा बहुमान समजतो. डॉ.शिशिर पळसापुरे म्हणाले की, डॉ. पांडे सरांच्या मार्गदशनमुळे मी आर. ई. बी. टी थेरपिस्ट, सुपरवाईझर होऊ शकलो. डॉ. भारती राजगुरू म्हणाल्या की त्यांना वयाच्या ६५ व्या वर्षी मानस शास्त्रा मध्ये पी. एच.डी करण्याचे प्रोत्साहन मला त्यांनी दिले आणि पदोपदी त्यांनी मदत केली.
पुण्यात आय. एम.ए, संचेती सभागृहात झालेल्या मुलाखतीत डॉ. उल्हास लुकतुके यांनी स्वतः आपण जसे आहोत तसं स्वताला स्विकारा हा सर्व उपस्थितांना संदेश दिला तर डॉ. अनुराधा सोहनी म्हणाल्या की मुलांबरोबर पालकांनी सुद्धा विकसित होण्याची गरज असते. मुलांची प्रगती फक्त मुलांच्या बुद्धिमत्तेवर, क्षमतेवरच अवलंबून असते असे नाही तर सुजाण पालकत्वचा तेवढाच महत्वाचा भाग असतो.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आचार्य डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले की, मानवी मन आणि त्याच मानसशास्त्र हे इतक अगाढ, खोल आहे की, त्याची व्याप्ती आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मानसशास्त्र हे आईसारख आहे, ते आपल्याला जवळ करत, आपल्यावर प्रेम करत. आपल्या समोर समुपदेशनसाठी बसलेल्या व्यक्तीच्या मनातील तरंग आपल्या मनात उमटतात, ही आपल्याला एक संधी असते आपल्या मनात डोकावण्याची. हे शास्त्र आपल्याला पदोपदी विकासाची संधी देत असत.
प्रमुख उपस्थित निवृत ब्रिगेडिअर डॉ. पेठे म्हणाले की सैन्यातील मानसिक आजार व त्याचे उपचार हे सारखेच असतात आणि तेथे उपचार करतांना आव्हाने कमी येतात कारण तेथे सर्व मिलिटरी प्रोटोकॉल प्रमाणे होते पण सामान्य माणसाचे मानसिक आजारांवर उपचार करतांना मनोविकार तज्ञांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे मानसिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सैन्यात जास्त आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर वाटवे यांनी मेंटल हेल्थ केयर अॅक्ट बाबत विस्तृत माहिती सांगितली. ते म्हणाले मनोरूग्णाना उपचार घ्यायचे की नाकारचे हा अधिकार प्राप्त झाला आहे, मनोविकार तज्ञ काय उपचार करतात हेही संपूर्ण जाणून घ्यायचा अधिकार प्राप्त झाले आहे. हा जितका सोईचा तितकाच उपचाराकरीता अडचणीचा असा कायदा आहे.
स्वयंसेवक म्हणून स्मिता लोंढे, रवींद्र जाधव, प्रतीक शिंदे, हिमानी कुलकर्णी ,डॉ. मकरंद कोकीळ, शंतनू दाते, अनिल दाते, प्रकृत अलोणे, गुणेश दादा होनप, वैशाली दाते व मोहिनी ताई कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापनाचे काम बघितले. सौ. प्रसन्ना अलोणे यांनी मैत्र मनाचे सन्मानाचे मानकरी यांचे मानपत्र वाचन केले, तर सौ. भाग्यश्री हलदुले व सौ. सुजाता होनप यांनी हे सुंदर मानपत्र लिहण्याचे काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैष्णवी कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संस्थापक संचालक राजेश अलोणे यांनी मानले. यानंतर शर्वरी लेले यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–