- स्वतःच्या आत जेव्हा शोधले मी…
- सुखाच्या चांदण्याला वेचले मी…
- कशासाठी जगाशी वाद घालू,
- चुकीचा मीच होतो जाणले मी…
- सभोती मोहमायेचा पसारा,
- भ्रमाचे भोपळे कुरवाळले मी…
- हवे होते मिळाले ना कधीही,
- नको त्याला हमेशा सोसले मी…
- जगाच्या पाठशाळेत आलो,
- धडे मग अनुभवाचे गिरवले मी…
- निराशेचा जरी काळोख येथे,
- मला आशेत तेवत ठेवले मी…
- @ संदीप वाकोडे
- मुर्तीजापूर
- मो. 9527447529